पीएम्इंडिया
वाराणसीतल्या राष्ट्रीय बीज संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था, दक्षिण आशियाई प्रादेशिक केंद्राच्या उभारणीला मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे.
या प्रस्तावाअंतर्गत, वाराणसीमध्ये तांदूळ मूल्यवर्धन उत्कृष्टता केंद्र उभारण्यात येईल. अद्ययावत प्रयोगशाळेचा यात समावेश असेल. या केंद्रामुळे या भागातल्या धान्य उत्पादनाला चालना मिळणार असून, अविरत तांदूळ उत्पादनातही या केंद्राची मोलाची भूमिका असेल.
तांदुळाचे विशेष वाण विकसित करण्यासाठी, भारताच्या समृद्ध जैवविविधतेचा उपयोग करून घेण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. यामुळे हेक्टरी उत्पादनात वाढ अपेक्षित असून पोषणमुल्यही वाढणार आहे.
N. Sapre/N.Chitale/Darshana