Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

विख्यात बौद्ध अभ्यासक रॉबर्ट ए. एफ. थुरमन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक


नवी दिल्‍ली, 18 जून 2026

विख्यात बौद्ध अभ्यासक रॉबर्ट ए. एफ. थुरमन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधानांनी थुरमन यांचा उल्लेख बौद्ध धर्माचे गाढे अभ्यासक,प्रख्यात शिक्षक आणि भारताचे निरंतर सुह्रुद असा केला. थुरमन यांनी आपल्या कार्याद्वारे बौद्ध विचारांना जागतिक स्तरावर लोकप्रिय केले आणि विविध संस्कृतींमध्ये सामंजस्याचे चिरस्थायी पूल बांधले, असेही मोदी यांनी म्हटले आहे.

काही वर्षांपूर्वी न्यूयॉर्क शहरात थरमन यांच्यासोबत झालेल्या भेटीचे स्मरण करून देत पंतप्रधान म्हणाले की, आम्हा उभयतात जिव्हाळ्याचे संभाषण झाले होते.

या दुःखद प्रसंगी थरमन यांच्या कुटुंबिय, मित्र आणि चाहत्यांप्रती आपल्या संवेदना पंतप्रधानांनी कळवल्या आहेत.

आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी म्हटले आहे:

“बौद्ध धर्माचे गाढे अभ्यासक, एक विख्यात शिक्षक आणि भारताचे निरंतर सुह्रुद  रॉबर्ट ए. एफ. थरमन यांच्या निधनाने मला तीव्र दुःख झाले आहे. आपल्या कार्याद्वारे त्यांनी बौद्ध विचारांना जागतिक स्तरावर लोकप्रिय केले आणि विविध संस्कृतींमध्ये सामंजस्याचे चिरस्थायी पूलही बांधले. काही वर्षांपूर्वी न्यूयॉर्क शहरात झालेली आमची भेट मला आजही आठवते, त्यावेळी आमच्यात  जिव्हाळ्याचा संवाद झाला होता. या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांसोबत आहेत.”

* * *

अंबादास यादव/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai