Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून जाफनामधील पुनर्निर्मित दुराईअप्पा स्टेडिअम श्रीलंकेच्या जनतेला समर्पित करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून जाफनामधील पुनर्निर्मित दुराईअप्पा स्टेडिअम श्रीलंकेच्या जनतेला समर्पित करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून जाफनामधील पुनर्निर्मित दुराईअप्पा स्टेडिअम श्रीलंकेच्या जनतेला समर्पित करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण


सुबह उदेशनक वेवा, आयुबोवन

गेल्या वर्षी मार्च महिन्यात मी जाफनाला गेलो होतो. त्यावेळी जाफनाच्या जनतेकडून मिळालेला स्नेह आणि प्रेम आजही माझ्या मनात ताजे आहे.

हा एक ऐतिहासिक दिवस होता कारण प्रथमच एका भारतीय पंतप्रधानाने जाफनाला भेट दिली होती.

आज आणखी एक महत्त्वपूर्ण दिवस आहे.

आपण पुन्हा एकदा श्रीलंकेची जनता आणि जाफनाचे रहिवासी यांच्याबरोबर भागीदारी साजरी करत आहोत.

आज, राष्ट्रपती सिरिसेना यांच्यासह मी पुनर्निर्मित दुराईअप्पा स्टेडिअम श्रीलंकेच्या जनतेला समर्पित करत आहे आणि यावेळी आम्ही एकटे नाही.

दळणवळाच्या आधुनिक साधनांमुळे भारताच्या सव्वाशे कोटी जनता आणि श्रीलंकेची जनता या सोहळ्यात सहभागी झाली आहे.

मित्रांनो,

सुमारे 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तुमच्या टाळ्यांचा कडकडाट आणि जय जयकाराने पुन्हा एकदा दुराईअप्पा स्टेडिअमचा आत्मा जागृत होईल. भले आम्ही हजारो किलोमीटर दूर दिल्लीत बसलेलो असलो तरी आम्ही जाफनामधील चैतन्य आणि बदलाचे वातावरण आजमावू शकू.

दुरईअप्पा स्टेडिअम केवळ विट आणि दगड एवढेच नाहीये. ते आशावाद आणि आर्थिक विकासाचे प्रतीक आहे. जाफनाच्या युवकांसाठी एक समृध्द आणि निकोप भविष्याचे एक क्षेत्र आहे.

हिंसाचाराचा वारसा दूर सारण्याच्या आणि आर्थिक प्रगतीच्या मार्गावर पुढे वाटचाल करण्याचा तुमचा दृढसंकल्प यातून दिसून येतो.

याच्या पायाभरणीत तुमचे साहस आणि महान बलिदान आहे. हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण होणे हे दर्शवतो की तुम्ही तुमचा भुतकाळ मागे सारला आहे आणि एका समृध्द भविष्याचे वचन देण्यासाठी पुढे पाहत आहात.

महामहीम सिरिसेना,

तुमचे दूरदर्शी नेतृत्व आणि हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान विक्रमसिंधे, राज्यपाल आणि उत्तरेकडील प्रांताचे मुख्यमंत्री यांनी दिलेल्या योगदानाला मी सलाम करतो.

मित्रांनो,

आपले संबंध आपल्या दोन सरकारांपुरतेच सिमीत नाही. आप‍ल्या इतिहास, संस्कृती, भाषा, कला आणि भूगोलाच्या समृध्द वारसाच्या ठायी ते आहेत.

भारताला मनापासून वाटते की, त्याच्या आर्थिक विकासाचा लाभ त्याच्या शेजारी देशांना देखील व्हावा. दुरईअप्पा स्टेडियम आपल्या सहकार्याच्या भावनेचे प्रतीक आहे. श्रीलंकेच्या विकासासाठी भारताचा पाठिंबा आहे आमच्या मैत्रीचे वचन आहे.

आणि, हे तुमच्या प्राधान्यक्रम आणि गरजांवर अवलंबून असेल की, तुम्ही आमच्यावर कितपत भरवसा ठेवू शकता. हेच आपल्या कायमस्वरुपी संबंधांना वर्तमानासाठी आणि भविष्यकाळासाठी देखील प्रासंगिक बनवतात.

मित्रांनो,

आर्थिकदृष्ट्या समृद्ध श्रीलंका पाहण्याची भारताची इच्छा आहे.

अशी श्रीलंका, जिथे देशातील जनतेमध्ये एकता आणि अखंडता, शांतता, सौहार्द आणि सुरक्षा तसेच समान संधी आणि प्रतिष्ठा असेल.

महामहीम सिरिसेना आणि मित्रहो,

आतापासून 72 तासांनी 21 जून रोजी संपूर्ण जग आंतरराष्ट्रीय योग दिनाचे दुसरे वर्ष साजरे करत असेल.

2014 मध्ये या विषयावरील संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावाच्या प्रारंभिक समर्थकांपैकी एक श्रीलंका होती.

आणि आज आपण जाफनामधील या दुरईअप्पा स्टेडिअममधून आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रारंभ साजरा करत आहोत. थोड्या वेळापूर्वी सादर करण्यात आलेल्या ‘सूर्यनमस्कारांनी’ जगाला समग्र आरोग्य आणि निसर्गाबरोबर सौहार्दपूर्ण शाश्वत राहणीमानाचा संदेश दिला आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनाचा याहून चांगला प्रारंभ आणि गौरव असूच शकत नाही.

महामहीम राष्ट्रपती सिरिसेना,

मी पुन्हा एकदा तुम्हाला इथे उपस्थित तुमचे सरकार आणि जाफनाच्या प्रेमळ लोकांना मला ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद देतो.

आपल्या चिरकालीन मैत्रीचे आणखी एक प्रतीक म्हणून दुरईअप्पा स्टेडिअम उभा राहील.

श्रीलंकेच्या विकास आणि समृध्दीच्या मार्गावर भारताची सदैव साथ असेल.

मी पुन्हा एकदा भारताच्या सव्वाशे कोटी जनतेच्या वतीने श्रीलंकेच्या जनतेला शुभेच्छा देतो.

बोहोमा स्तुति, मिक्का नंदरी, खूप खूप धन्यवाद!

S. Kane/B.Gokhale