पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शाश्वत आणि स्मार्ट नागरी विकासासाठी तांत्रिक सहकार्य करण्याबाबत भारत आणि डेन्मार्क यांच्यात एप्रिल 2018 मध्ये झालेल्या सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली.
सविस्तर माहिती :
शाश्वत आणि स्मार्ट नागरी विकासासाठी परस्पर तांत्रिक सहकार्य करण्याबाबत भारत आणि डेन्मार्क यांच्यात हा करार करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत, माहिती-ज्ञान, संस्थात्मक सहकार्य, संशोधन आणि विकास तसेच व्यावसायिक संबध अधिक दृढ केले जाणार आहेत. स्मार्ट नागरी उपाययोजना, वसाहतीकरण, शाश्वत आणि एकात्मिक नागरी नियोजन, पुनर्विकास आणि जमिनीशी संबंधित प्रश्न अशा क्षेत्रात हे सहकार्य अपेक्षित आहे. त्याशिवाय घनकचरा व्यवस्थापन, शाश्वत वाहतूक व्यवस्था, पाणी आणि स्वच्छता व्यवस्थापन, उर्जाक्षमता अशाही विषयांवर दोन्ही देश परस्परांना मदत करतील.
या कराराच्या अंमलबजावणीसाठी एक संयुक्त कृतीगट स्थापन केला जाईल. ह्या कृतीगटाच्या ठराविक कालावधीत दोन्ही देशात बैठका होतील.
दोन्ही देशात,शाश्वत आणि स्मार्ट नागरी विकासाच्या क्षेत्रात, द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यासाठी हा करार महत्वाचा ठरेल. तसेच, कराराच्या अंमलबजावणीमुळे, घनकचरा व्यवस्थापन, शाश्वत वाहतूक व्यवस्था, पाणी आणि स्वच्छता व्यवस्थापन, उर्जा अशा क्षेत्रात रोजगारनिर्मिती होणे अपेक्षित आहे.
***
B.Gokhale/R.Aghor/D.Rane