Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

श्रीलंकेच्या माजी राष्ट्राध्यक्ष चंद्रिका कुमारतुंगा भंडारनायके यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

श्रीलंकेच्या माजी राष्ट्राध्यक्ष  चंद्रिका कुमारतुंगा भंडारनायके यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

श्रीलंकेच्या माजी राष्ट्राध्यक्ष  चंद्रिका कुमारतुंगा भंडारनायके यांनी घेतली पंतप्रधानांची भेट


श्रीलंकेच्या माजी राष्ट्राध्यक्ष चंद्रिका कुमारतुंगा भंडारनायके यांनी आज (३ सप्टेंबर २०१५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नवी दिल्ली येथे होत असलेल्या ‘संवाद- संघर्ष टाळणे व पर्यावरणविषयक जागृती या विषयावरील जागतिक हिंदू-बौद्व उपक्रम’ या परिषदेत भाग घेण्यासाठी त्या भारत दौऱ्यावर आहेत.

श्रीलंकेतील शांतीपूर्ण व सहकार्यपूर्ण रीतीने संसदीय निवडणूकांच्या यशस्वी आयोजनाला देशातील लोकशाहीचे प्रतिबिंब असे संबोधून पंतप्रधानांनी त्यांचे स्वागत केले.

श्रीलंका व भारत यांमधील संबंधांना दृढ करण्याच्या उद्देशाने चंद्रिका यांनी निभावलेल्या नेतृत्वपूर्ण भूमिकेचे पंतप्रधानांनी कौतुक केले. चंद्रिका श्रीलंकेत महत्वपूर्ण भूमिका बजावत राहतील असा विश्वास व्यक्त केला. यामुळे त्या वास्तववादी सलोखा आणि सामाजिक सुसंवाद या दिशेने अग्रेसर राहतील; जिथे सर्व समुदायांच्या महत्वाकांक्षा संयुक्त श्रीलंकेच्या रुपात पूर्ण होऊ शकतील.

भारत, श्रीलंकेसोबतच्या संबंधांना सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. दोन्ही देशात ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृढ संबंध आहेत. या संबंधांना नवा आयाम देण्यासाठी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधान यांसोबत काम करण्याची प्रतिक्षा करत आहेत, असे ते म्हणाले.

S.Pophale/N.Sapre