Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

श्रीलंकेत झालेल्या भीषण बॉम्बस्फोटांचा पंतप्रधानांकडून तीव्र निषेध


श्रीलंकेत झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोटाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

‘श्रीलंकेत झालेल्या भीषण बॉम्बस्फोटांचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो. अशा क्रूर आणि नृशंस कृत्यांना या प्रदेशात काहीही जागा नाही. या कठीण प्रसंगी सर्व भारतीय श्रीलंकेसोबत ठामपणे उभे आहेत, या हल्ल्यात बळी गेलेल्यांचे कुटुंबिय आणि जखमी नागरिकांसाठी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

N.Sapre/R.Aghor/P.Kor