Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

श्रीलंकेमधील महाबोधी सोसायटी येथील पंतप्रधानांचे संबोधन


s2015031363056 [ PM India 174KB ]

s2015031363055 [ PM India 173KB ]

s2015031363054 [ PM India 235KB ]

s2015031363051 [ PM India 271KB ]

s2015031363049 [ PM India 207KB ]

माझ्यासाठी ही खूप सौभाग्याची गौष्ट आहे की, आज महाबोधक सोसायटीसारख्या पवित्रस्थळी येऊन सर्व पूज्य संतांचे आशिर्वाद घेण्याची संधी मला मिळाली आणि यासाठी मी विशेषत: महाबोधी सोसायटीच्या अध्यक्षांचे मनापासून आभार मानतो. तुम्ही मला सांची अवशेषांचे दर्शन करण्याचा आणि पुण्य प्राप्त करण्याची संधी दिल्याने मी तुमचे विशेष आभार मानतो.

बौध्द भिक्षूंचे आशीर्वाद मिळाले. त्यांनी माझ्यासाठी, भारत व श्रीलंकेसाठी, आमच्या एकतेसाठी, आमच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली ही बाब खूपच हृदयस्पर्शी आहे आणि मी पुन्हा तुम्हा सर्वांना वंदन करतो.

श्रीलंकेमध्ये सांस्कृतिक आणि राजकीय पुनर्जागरणामध्ये अंगारिका धर्मपालांची मुख्य भूमिका होती. बौध्द धर्माच्या पुनरूत्थानासाठी करण्यात आलेल्या महाबोधी सोसायटीच्या स्थापनेमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. बौधगयामधील महादेवी वर्माच्या प्राचीन मंदिराचा महिमा त्याला पुन्हा प्राप्त करून देण्यामध्ये या सोसायटीचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

संपूर्ण विश्वातील सर्वात जुन्या बौध्द धर्माचे पालन करणार कोणता देश असेल तर तो श्रीलंका आहे असे बोलले जाते.

आज विश्वात जर आपण अनेक देशांमध्ये गेलो तर आपल्याला श्रीलंकेचे बौध्द भिक्षू तिथे हे पवित्र कार्य करताना दृष्टीस पडतील.

बुध्द आपल्या सर्वांना जोडतात आणि माझे तर हे सौभाग्य आहे जसे स्वामीजींनी सांगितले की जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्ही मी एका आंतरराष्ट्रीय बुध्द सभेचे आयोजन केले होते. जगातील 20 हून अधिक देशातून सर्व गणमान्य आले होते, तुम्ही देखील आला होतात कारण सामान्यत: असा समज आहे की बुध्दांचा अधिक प्रभाव पूर्व भारतात आहे परंतु मी तर गुजरातमधून आहे, भारताच्या पश्चिमी टोकाकडून, परंतु तिथेही बुध्दांचा तितकाच प्रभाव होता.

माझे हे भाग्य आहे की माझा जन्म ज्या गावात झाला वर्णगढ, चीनी तत्वज्ञ हिऊएन तसांग जवळजवळ 800 वर्षांपूर्वी भारतात आले होते आणि 800 वर्षांपूर्वी त्यांनी भारताचे जे वर्णन लिहिले होते त्यानुसार त्यांनी एक प्रदिर्घ काळ माझ्या गावात वास्तव्य केले होते. आणि त्यांनी लिहिले आहे की माझ्या गावात जिथे माझा जन्म झाला, तिथे बुध्द भिक्षूकांचे एक मोठे प्रशिक्षण केंद्र होते. 10 हजारांहून अधिक बौध्द भिक्षू तिथे राहतील इतके मोठे वसतीगृह होते.

हिऊएन तसांग यांच्या या म्हणण्यानुसार जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मी माझ्या गावात उत्खनन केले आणि तुम्हाला सर्वांना हे ऐकून आनंद होईल की जेव्हा उत्खनन केले तेव्हा सर्व गोष्टी सापडल्या. ती मोठी मोठी वसतीगृहे, ते बौध्द भिक्षूकांचे प्रशिक्षण केंद्र आणि इतकेच नव्हे, आमच्या येथे गुजरातमध्ये एक जागा आहे देव की मोरी तिथे उत्खनन केले असता भगवान बुध्दांच्या अवशेषांमध्ये आम्हाला एक सुवर्णपेटी मिळाली. आणि मी थेरो जींना घेऊन गेलो होतो त्या सर्व गोष्टी दाखविण्यासाठी त्यांचे दर्शन करण्यासाठी घेऊन गेलो होतो.

जेव्ही मी मुख्यमंत्री होतो तेव्हा माझे एक स्वप्न होते की जिथून आम्हाला भगवान बुध्दाचे अवशेष मिळाले तिथे भगवान बुध्दाचे एक भव्य मंदिर बनवावे. मला नेहमी असे वाटते की आज विश्व ज्या संकंटांमधून जात आहे ज्या दहशतवादाच्या सावलीत जग भयभीत झाले आहे, बुध्दाचा मार्ग हा आहे जो युध्दापासून मुक्ती देतो.

आणि मी पुन्हा एकदा या पवित्र स्थळी सर्व संतांचा आशीर्वाद घेण्याचे सौभाग्य मला प्राप्‍त झाले. मी पुन्हा सर्वांना वंदन करतो. स्वागत सन्मानासाठी वंदन करतो आणि तुम्हा सर्वांचे आभार मानतो.