पीएम्इंडिया
संयुक्त राष्ट्रांमधल्या अमेरिकेच्या स्थायी प्रतिनिधी निक्की हेली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यातर्फे त्यांनी शुभेच्छा दिल्या. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना आपल्या शुभेच्छा पोहोचवाव्यात असं पंतप्रधानांनी त्यांना सांगितले आणि ट्रम्प यांच्यासमवेत याआधी झालेल्या भेटीचे स्मरण केले.
भारत आणि अमेरिका यांच्यात विशेषत: धोरणात्मक आणि संरक्षण क्षेत्रात संबंध अधिक घनिष्ठ होत असल्याची दखल राजदूत हेली यांनी घेतली. दहशतवादाला आळा घालणे आणि इतर बहुविध क्षेत्रात भारत-अमेरिका सहकार्य वृद्धींगत करण्याच्या मार्गांवर यावेळी चर्चा झाली. भारत-अमेरिका यांच्यातील मजबूत भागीदारी, जागतिक शांतता आणि भरभराटीसाठी महत्वाची बाब असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या दक्षिण आशिया आणि इंडो पॅसिफिक धोरणाची तसेच कोरियन द्वीपकल्प अण्वस्त्रमुक्त करण्यासाठीच्या पुढाकाराची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
S.Tupe/N.Chitale/P.Malandkar
Ambassador @nikkihaley, United States Permanent Representative to the United Nations calls on Prime Minister @narendramodi. https://t.co/zz3idyORai
— PMO India (@PMOIndia) June 27, 2018
via NaMo App