Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

संसदेबाहेर माध्यमांसमोर पंतप्रधानांनी केलेले निवेदन

संसदेबाहेर माध्यमांसमोर पंतप्रधानांनी केलेले निवेदन


संसदेच्या महत्त्वपूर्ण अधिवेशनाचा शेवटचा टप्पा आजपासून सुरु होत आहे. प्रामुख्याने आर्थिक विषयांवर यामध्ये चर्चा होईल. या अधिवेशनाचा पहिला टप्पा खूपच फलदायी राहिला. सर्व पक्षांनी मिळून संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालवण्याचा प्रयत्न केला आणि अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देखील झाले आणि त्याचे समाधान सर्व पक्षांच्या खासदारांच्या चेहऱ्यावर दिसत होते. यावेळी देखील त्याच उमेदीने, उत्साहाने, लोकशाहीच्या मजबूत परंपरांसह मोकळेपणाने चर्चा करत हे अधिवेशन पार पाडू आणि चांगले निर्णय घेऊ. हा माझा विश्वास आहे. धन्यवाद. असे पंतप्रधानांनी संसदेबाहेर निवेदनात सांगितले.

S.Kane / B. Gokhale