Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सरकारचे प्रमुख म्हणून देशसेवेची 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल इथिओपियाचे पंतप्रधान अबिय अहमद अली यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली


पंतप्रधान अबिय अहमद अली यांनी आणखी एका कार्यकाळासाठी पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

मोदी यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये इथिओपियाला दिलेली भेट तसेच नवी दिल्लीत पंतप्रधान अबिय अहमद अली यांच्याशी झालेली अलीकडील भेट यांचे स्मरण केले. ते म्हणाले  की, भारतासाठी इथिओपियासोबतची धोरणात्मक भागीदारी अतिशय महत्वाची आहे आणि हे  सहकार्य व मैत्री अधिक दृढ करण्यासाठी त्यांच्यासोबत एकत्र काम करण्यास भारत उत्सुक आहे.

मोदींनी ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये म्हटले आहे;

“पंतप्रधान अबिय अहमद अली, तुमच्या स्नेहपूर्ण शुभेच्छांबद्दल धन्यवाद. तुम्ही आणखी एका कार्यकाळासाठी पदभार स्वीकारल्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो.

 गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये इथिओपियाला दिलेली भेट आणि नवी दिल्लीतील आपल्या अलीकडील भेटीची आठवण यानिमित्ताने येते. भारतासाठी इथिओपियासोबतची धोरणात्मक भागीदारी अतिशय महत्वाची आहे आणि हे  सहकार्य व मैत्री अधिक दृढ करण्यासाठी  एकत्र काम करण्यास भारत उत्सुक आहे.

***

Neha Kulkarni / Sushma Kane / Madhura Nerurkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai