पीएम्इंडिया
साखरेचा साठा करण्याविषयीच्या निर्णयाला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला आज केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली . 27 ऑक्टोबर 2016 साली केंद्र सरकारने हा निर्णय घेतला होता, त्याला आता 28 ऑक्टोबर 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या निर्णयानुसार ,राज्य सरकारांना साखरेचा साठा करण्याची मर्यादा किंवा परवाना देण्याचे अधिकार असतील.गरजेनुसार केंद्र सरकारच्या परवानगीने त्याना हे आदेश देता येतील.सर्वसामान्य माणसांना रास्त दरात साखर उपलब्ध व्हावी आणि साखरेचा साठा आणि नफेखोरी याला आळा बसावा यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाची अधिसूचना लवकरच जारी केली जाणार असून,ती सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवली जाईल.
यावर्षी देशात साखरेचे उत्पादन कमी होण्याचा अंदाज असून त्यामुळे साखरेचे दर वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, सरकारने साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
N.Sapre/ R.Aghor/P.Malandkar