Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

साखरेसंदर्भातील विद्यमान केंद्रीय आदेशाच्या वैधतेला मुदतवाढ


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज साखरेसंदर्भातील विद्यमान केंद्रीय आदेशाच्या वैधतेला 29 ऑक्टोबर 2016 ते 28 एप्रिल 2017 अशी सहा महिन्यांची मुदतवाढ मंजूर केली.

राज्य सरकारांना आवश्यकतेनुसार साखरेचे दर नियंत्रणात राखणे, साखरेचा साठा मर्यादा, परवाना आवश्यकता या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना रास्त दरात साखर उपलब्ध व्हावी आणि नफेखोरीसाठी साखरेच्या साठेवाढीवर नियंत्रण राहणे शक्य होणार आहे.

B.Gokhale/M.Pange/P.Kor