Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सामायिक संचार टॉवर्स आणि संलग्न पायाभूत सुविधांच्या बांधकामासाठी दळणवळण परिचालकांना संरक्षण खात्याची जमीन उपलब्ध करून देण्याच्या धोरणात सुधारणा करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सामायिक संचार टॉवर्स आणि संलग्न पायाभूत सुविधांच्या बांधकामासाठी दळणवळण परिचालकांना संरक्षण खात्याची जमीन उपलब्ध करून देण्याच्या धोरणात अंमलबजावणीचा अनुभव आणि दूरसंचार विभागाच्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे  सुधारणा करायला मंजुरी दिली आहे.

सुधारित धोरणामध्ये सामायिक संचार टॉवर्स आणि संलग्न पायाभूत सुविधांसाठी सेवा परवाना धारक आणि दूरसंचार विभागाबरोबर पायाभूत सेवा प्रदाता-१ म्हणून नोंदणीकृत कंपन्यांना संरक्षण क्षेत्र आणि छावणी परिसरात भाडेपट्ट्याने संरक्षण विभागाच्या जमिनीचे वितरण आणि परवानगी देण्याच्या नियम आणि अटी निर्धारित करण्यात आल्या आहेत.

यामुळे दळणवळणाच्या सेवांची गुणवत्ता सुधारेल.

 

N.Sapre/S.Kane/P.Kor