Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सिटी कंपास्टला प्रोत्साहन देणाऱ्या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी


सिटी कंपोस्टला प्रोत्साहन देणाऱ्या धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली.
या धोरणाअंतर्गत, सिटी कंपोस्टसाठी प्रतिटन 1500 रुपये बाजारपेठ विकास सहाय्य उपलब्ध करुन दिले जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी सिटी कंपोस्ट कमी दरात उपलब्ध होईल. शहरातील कचऱ्यापासून तयार करण्यात आलेल्या कंपोस्ट खतामुळे मातीला कार्बन आणि अन्य मुख्य पोषण मूल्ये मिळतील आणि शहर स्वच्छ राखायला मदत होईल. कंपोस्टिंगमुळे कचऱ्याची घनता देखील कमी होईल.

खत कंपन्या आणि विपणन संस्था देखील त्यांच्या डीलरमार्फत सिटी कंपोस्ट विकू शकतील. तसेच सरकारी विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना सिटी कंपोस्टचा वापर करायला सांगण्यात आले आहे.

संबंधित मंत्रालये/विभाग शेतकऱ्यांना सिटी कंपोस्टचे फायदे समजावून सांगण्यासाठी अभियान राबवणार असून सर्व राज्यांमध्ये कपोस्ट कारखाने उभारण्यासाठी उपाययोजना करतील.

S.Kane/S.Tupe/M.Desai