Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सुकमा इथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना हौतात्म्य, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दुःख


छत्तीसगडमधल्या सुकमा इथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या काही जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. सुकमा इथल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करून ,पंतप्रधानांनी, हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि त्याच्या कुटुंबियांकडे शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

जखमींच्या प्रकृतीला लवकर आराम वाटावा असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. सुकमा इथल्या परिस्थितीबद्दल केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली असून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते सुकमा इथे जाणार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale / N.Chitale