Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सेबी आणि कुवेतच्या सीएमए यांच्यातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सेबी म्हणजेच भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ आणि कुवेतच्या सीएमए म्हणजेच भांडवली बाजार प्राधिकरण यांच्यामध्ये झालेल्या कराराला मान्यता देण्यात आली. या करारानुसार उभय संस्था एकमेकांना तांत्रिक सहकार्य करणार आहेत.

या करारानुसार भांडवली बाजारामध्ये कार्यरत असलेल्या या दोन्ही नियामक संस्था विशिष्ट चौकट निश्चित करून आर्थिक माहितीची आणि तंत्रज्ञानाची देवाण घेवाण करता येणार आहे. आणि रोखे बाजारपेठेचा प्रभावी विकास करण्याच्या दिशेने कार्य करता येणार आहे. या करारामुळे उभय देशांच्या या संस्थांना परदेशातही सहकार्य करणे शक्य होणार आहे.

N.Sapre/S.Bedekar/Anagha