पीएम्इंडिया
व्यासपीठावर उपस्थित हरियाणाचे राज्यपाल श्री सत्यदेव नारायण आर्यजी, मुख्यमंत्री मनोहर लालजी, मंत्रिमंडळातले माझ्या सहाय्यक सुश्री उमा भारतीजी, मंत्री कविता जैन जी, आमदार बरालाजी, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्माजी, उपस्थित सर्व मान्यवर, देश-विदेशातून आलेल्या स्वच्छाग्रही बंधू आणि भगिनींनो, ही ज्ञान, धर्म आणि कर्म यांची भूमी आहे, जिथे सभ्यतेचे पालनही होते. भगवान कृष्णाने जिथून माणुसकीला जीवनाचा मार्ग दाखवला. सत्य आणि न्यायाचा मार्ग जिथून स्थापित झाला, अशा या पवित्र भूमीवर देशभरातून आलेल्या सर्वांना मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो. श्रीकृष्णाच्या नेतृत्वात हजारो वर्षांपूर्वी कुरुक्षेत्राच्या याच भूमीवरुन अनैतिकता साफ करणारी एक स्वच्छता मोहीम राबवली होती. आज काळ बदलला आहे, आपण रोजच्या जीवनात स्वच्छतेसाठी लढत होतो. जगात गीतेतला संदेश अद्वितीय आहे. ज्या युद्ध भूमीवर जीवन-मरणाचे खेळ होत होते, नैतिकता आणि अनैतिकता यांच्यात संघर्ष होत होता, त्याच भूमीवर त्याच वातावरणात हजारो वर्षांपर्यंत श्रीकृष्णाच्या मुखातला संदेश उपस्थित झाला, जो गीतेच्या स्वरुपात आपल्याला माहिती आहे. युद्ध भूमीत मानवतेचा इतका मोठा संदेश कदाचितच निघू शकतो आणि ही या देशाची विशेषता आहे. स्वच्छतेच्या शक्तीचा हा विस्तार स्वच्छते प्रति देशाच्या नवीन संस्काराचा एक पुरावा आहे.
देशभरातून या कुरुक्षेत्रच्या प्रेरणा स्थानी तुम्हा सर्वांचे एकत्र येणे हे स्वच्छ भारत संकल्प, नवीन भारत संकल्पला आणखी मजबूत करत आहे. देशातल्या अनेक केंद्रातून तंत्रज्ञानाद्वारेही भगिनींनी या कार्यक्रमात सहभागी असल्याचे मला सांगितले आहे. याचबरोबर हरियाणातल्या पाच ठिकाणीही असेच मोठे कार्यक्रम होत आहेत आणि अशा जनवेदिनी त्या ठिकाणीही आहेत. फरीदाबाद, पानीपत, करनाल, पंचकूला, देशातूनच नाही तर परदेशातूनही आज या समारंभाला आले आहेत. तसेच नायजेरियातून आलेले एक प्रतिनिधीमंडळ माझ्या समोर आहे. स्वच्छ भारत मिशनने इतक्या लवकर नाट्यपूर्ण यश कसे साध्य केले आणि ते तुम्ही नायजेरियात कसे राबवू शकता, हे शिकण्यासाठी, तुम्ही गेल्या आठवड्यापासून येथे शैक्षणिक सहलीला आला आहात.
मनोहर लालजींनी सांगितलेले आकडे, ती माहिती ऐकून मी चकीत झालो आहे. महिला सशक्तीकरणासाठी हरियाणात झालेले काम आणि त्याला मिळालेले यश याचा तपशील तुम्ही दिला आहे. मी मनोहर लालजींचे आणि त्यांच्या पूर्ण संघाचे अभिनंदन करतो आणि तुम्ही सगळ्यांनी पण हरियाणा सरकारचे टाळ्या वाजवून अभिवादन करा.
मित्रांनो, आज स्वच्छ भारत मोहीमेचे अनुकरण जगातील इतर देशही करत आहेत. ही तुमच्या संकल्प आणि समर्पणाची शक्ती आहे. तुमच्यातल्या ज्या भगिनींना या मोहीमेसाठी आज स्वच्छ शक्ती पुरस्कार मिळाला त्यांचे खूप खूप अभिनदंन आणि तुमच्या ग्रामस्थांचेही अभिनंदन ज्यांनी तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तुमच्या कार्यात मदत करुन गावाचा नावलौकिक उंचावला, त्या गावातील सर्वांना माझा प्रणाम. आत्ता थोड्या वेळापूर्वी मी इथल्या प्रदर्शनाला भेट दिली. एका महिन्यात सवा कोटीहून अधिक शौचालयांवर चित्र रंगवणे हे खूप मोठे यश आहे. आजकाल कोणत्या जिल्ह्यात जर सौंदर्य स्पर्धा झाली, तर कितीतरी महिने त्या स्पर्धेच्या बातम्या येतात, फोटो छापतात.
पहिल्यांदा आपण एक अशी स्पर्धा घेतली, ज्यात शौचालयांचे सौंदर्यीकरण झाले, ज्याचे नाव इज्जतघर आहे. आपण जोपर्यंत शौचालयाच्या प्रतिष्ठेचा स्वीकार करत नाही, तोपर्यंत स्वच्छता हा स्थायीभाव बनणार नाही आणि या स्पर्धेमागचा मुख्य उद्देश हाच आहे. गावात येणाऱ्याला प्रत्येक घराजवळ छोटी छोटी रंगीबेरंगी जागा दिसेल, ते इज्जतघर आहे, शौचालय आहे, हे माहिती होईल, तेव्हा त्यांना या गावात विकास झाल्याचेही कळेल.
युरोपमध्ये एक पर्यटन स्थळ आहे, जिथे खूप पर्यटक येतात. कारण तिथल्या लोकांनी आपल्या घराच्या दरवाजाच्या बाहेरील भिंतींना एकसारख्या रंगांनी रंगवले आहे. जेव्हा त्यांनी हे केले तेव्हा ज्यांना जो रंग आवडला तो केला पण हळूहळू हेच एक प्रसिद्धीचे कारण बनले. आणि नंतर तिथले लोक दरवर्षी आपल्या घरांच्या समोरील भिंतीवर विशेष रंगरंगोटी करुन सुंदर बनवतात. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की या एका कारणामुळे त्या शहराची रचना बघण्यासाठी हजारो पर्यटक तिथे भेट देतात. यदाकदाचित असा दिवस पण येईल की भारतात सुध्दा एखादे गाव असे निघेल, जिथली शौचायले सुंदर रंगवलेली, छान चित्रकला असलेली असतील, ज्यामुळे कदाचित पर्यटक ते बघण्यासाठी उत्सुक होतील.
मित्रांनो, हरियाणाच्या भूमीतून आपण जितके मोठे लक्ष्य निश्चित केले ते सर्व लक्ष्य आपण साध्य केले म्हणून मी आजच्या दिवशी या भूमीचे आभार मानण्यासाठी आलो आहे. भारतीय जनता पार्टीने जेव्हा मला पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवला होता, तेव्हा हरियाणातूनच मी देशवासियांचे आशीर्वाद घेण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी मी हरियाणाच्या जवानांकडून आशीर्वाद घेतले होते, कुरुक्षेत्रच्या भूमीवरुन आज देशभरातल्या मातांचे आशीर्वाद घेत आहे. जिथे भगवान कृष्णाने विजयध्वज फडकवला होता, तिथूनच मी आपल्याकडून आशीर्वाद घेत आहे.
मित्रांनो, या भूमीवर मी माजी सैनिकांसाठी ‘वन रॅंक वन पेंशन’चे वचन दिले होते आणि ते पूर्णही केले. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’या योजनेचे उद्घाटनही याच भूमीवर झाले आणि बघता बघता संपूर्ण देशात जनआंदोलनासारखी पसरली. ‘आयुष्मान भारत’ या जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य योजनेची पहिली लाभार्थी हरियाणाची मुलगी आहे. ‘स्वच्छ शक्ती’ मोहीमेच्या तिसऱ्या आवृत्तीची सुरुवातही आज हरियाणातूनच होत आहे.
मित्रांनो, हरियाणात मला जे प्रेम मिळाले, त्याची परतफेड करण्याचा मी प्रयत्न करत आहे. गेल्या साडेचार वर्षांमध्ये मनोहर लाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारबरोबर प्रत्येक हरियाणावासीचे जीवन सोपे करण्याचा प्रयत्न करत आहोत. याचसंदर्भातल्या विस्तारासाठी थोड्यावेळापूर्वी आरोग्य आणि संस्कृतीशी संबंधित अनेक प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करण्यात आली. झज्जारची राष्ट्रीय कर्करोग संस्था, कुरुक्षेत्रमधील आयुष विद्यापीठ, करनालमधील आरोग्य विज्ञान विद्यापीठ, पंचकुलामधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, ईएसआयसी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय हे सर्व प्रकल्प हरियाणावासियांचे जीवन निरोगी आणि सुलभ बनवणार आहेत. त्याचबरोबर, या प्रकल्पांच्या माध्यमातूनइथल्या युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.याशिवाय आज इथे पानीपतच्या लढाईशी संबंधित संग्रहालयाची पायाभरणीही करण्यात आली आहे. ही लढाई आपल्याला देशाच्या संरक्षणासंबंधात महत्वपूर्ण धडे देते.
पानीपतच्या लढाईचे जे रुप, जी कल्पना मनोहर लालजींनी केली आहे,ती एक प्रकारे,त्याकाळात‘एक भारत श्रेष्ठ भारत’अशी लढाई संपूर्ण देशाने खांद्याला खांदा लावून लढली होती,याचा उत्तम पुरावा आहे, त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. कोणीही इतिहास विसरुन इतिहास घडवू शकत नाही, इतिहासाच्या आधाराने पुढे चालणारा नेहमी यशस्वी होतो. काही लोकांच्या मते हिंदुस्तानचा इतिहास १९४७ पासून सुरु झाला आहे आणि एकाच कुटुंबापासून सुरु होतो आणि या विचारामुळेच देशाच्या इतिहासाची पाळमुळं तोडली गेली आहेत.
इतिहासाला आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जागृत ठेवण्याचे, येणाऱ्या पिढ्यांसाठी ओळख ठेवण्याचे, प्रशिक्षित करण्याचे एक उत्तम कार्य हरियाणाच्या या भूमीवर सुरु होत असल्याचा मला आनंद आहे. या सर्व प्रकल्पांसाठी मी हरियाणाच्या जनतेला खूप-खूप शुभेच्छा देतो.
मित्रांनो, नारी शक्ती सारख्या योजनांच्या आधारे हरियाणा,देशाच्या परंपरेला सशक्त करण्यात तत्पर आहे.इथल्या अनेक मुली,आधुनिक भारताच्या निर्माणात योगदान देणात आणि नवीन भारताच्या संकल्पाला सशक्त करण्यात सहभागी आहेत.
भारताच्या मुलींसाठी आकाशाची उंचीही कमी पडत असल्याचे कल्पना चावला हिने दाखवून दिले.तसेच आज भारत खेळात जागतिक स्तरावर आपला दर्जा उंचावत आहे, त्यातही हरियाणाच्या मुली पुढाकार घेत आहेत.
मित्रांनो, आपल्यातल्या अनेक भगिनींनी कल्पना चावला प्लॅनेटरियम तसेच महिला पोलिस ठाणे येथे गेल्या होत्या. याशिवाय हरियाणात होणाऱ्या वेस्ट टू वेल्थ,कचऱ्यापासून सोने बनवण्यासंबंधित नवीन तंत्र, शेतीसंबंधित नवीन तंत्र,अशा अनेक नाविन्यपूर्ण प्रयोगाचीही माहिती तुम्ही घेतली आहे. या प्रकारचे कार्यक्रम आधी दिल्लीत होत होते, आता दिल्ली बाहेरही होतात. हरियाणातल्या चांगल्या गोष्टी इथे येऊन पाहून त्या आपल्याकडे लागू करतील. या प्रयत्नातून एका नवीन प्रशिक्षण शिबिरासारखे काम इथे झाले आहे.
मित्रांनो, जर मुली सशक्त होतील, तरच समाज सशक्त होईल असे माझे स्पष्ट मत आहे म्हणूनच गेल्या साडेचार वर्षांमध्ये जितक्या मोठ्या योजना किंवा कार्यक्रम केले गेले त्यात महिला सशक्तीकरण हेच ध्येय आहे.महिलांना त्यांच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. बेटी बचाओ-बेटी पढाओ या योजनेमुळे मुलींच्या गुणोत्तरात सुधारणा झाली आहे. उज्ज्वला योजनेमुळे महिलांना धुरापासून मुक्ती मिळाली आहे. राष्ट्रीय पोषण मोहीम आणि प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व मोहीमेमुळे गर्भवती मातांच्या जीवावरचे संकट कमी झाले आहे.बलात्कारासारखे अत्याचार करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद पहिल्यांदाच आमच्या सरकारने केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या घराची नोंदणी सुध्दा महिलांच्याच नावावर होते. महिलांच्याच नावावर घर नोंदणी होण्याला प्राधान्य दिले जाते. आपल्या समाजातल्या रचनेनुसार कुटुंबातील जमीन, गाडी, बंगला, दुकान, घर सर्व नवऱ्याच्या नावे असते आणि त्यानंतर मुलाच्या नावे होते, पण महिलेच्या नावे काही नसते. या परिस्थितीत बदल घडवण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतलीसर्व घरे महिलांच्याच नावे देण्याचा निर्णय घेतला.
मित्रांनो, पहिल्यांदाच मुलींना स्वयंपाकघराशिवाय इतर कार्यात योगदान द्यायला प्रोत्साहित केले जात आहे. देशात पहिल्यांदाच मुली लढाऊ वैमानिक बनत आहेत. आता तर सैन्यात सुध्दा मुलींची भर्ती होत आहे. नोकरदार महिलांना त्यांच्या नवजात बाळाच्या पालनपोषणासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी मातृत्व रजेचा कालावधी 12 आठवड्यांहून 26 आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनातल्या 15 कोटी कर्जातून अंदाजे 11 कोटींचे म्हणजेच 75 टक्के कर्ज महिला उद्योजकांना मिळाले. दीनदयाल अंत्योदय योजनेअंतर्गतजवळपास 6 कोटी महिला बचतगटांशी जोडल्या गेल्या आहेत. 75 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज अशा बचतगटांना उपलब्ध करुन दिले आहे. ही रक्कम 2014 च्या आधीच्या चार वर्षांत दिल्या गेलेल्या कर्जाच्या अडीचपट जास्त आहे.
मित्रांनो,या वर्षीच्या अर्थसंकल्पात महिलांसाठीच्या योजना, अंगणवाडी योजना, आशा सेविका योजना,राष्ट्रीय पोषण मोहीम,मुलांसाठीच्या योजनांवर विशेष लक्ष दिल्याचे दिसते.
मित्रांनो,स्वच्छ भारत मोहीमेवर जर मी इतका भर दिला आहे, तर त्यामागे देशातल्या महिलांचा मोठेपणा आणि त्यांचा सन्मान आहे. वर्ष 2014 मध्ये जेव्हा तुम्ही मला प्रधान सेवकाचे दायित्व सोपवले,त्यावेळीच्या परिस्थितीत जवळपास 30 कोटी महिलांना शौचालयासाठी अंधाराची वाट पहावी लागत होती. शाळेत मुलींसाठी वेगळे शौचालय नसल्याच्या कारणावरुन अनेक मुली शाळा सोडत होत्या. महिलांचा असा त्रास मी लहानपणापासून बघत आलो,या कारणानेच मी देशातल्या महिलांना या अपमान आणि त्रासातून मुक्ती देण्याचा संकल्प लाल किल्यावर केला. त्यावेळी हा कोणत्या प्रकारचा पंतप्रधान आहे जो लाल किल्यावरुन शौचालयाबद्दल बोलतो आहे, अशी आधीच्या सत्ताधाऱ्यांनी माझ्यावर कशा प्रकारे आणि किती टीका केली,हे तुम्ही पाहिले असेल. माझ्या विचारांवर आणि आकलनावर अपमानास्पद भाष्य केली गेली.
मित्रांनो, टीका करणाऱ्यांना महिलांच्या त्रासाची काळजी नव्हती, पण मला याची जाणीव आणि या महिलांची काळजीही आहे. आणि म्हणूनच मी या सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या लोकांच्या बोलण्याकडे कधी लक्ष दिले नाही. माझ्या कोट्यवधी भगिनींना सन्मान आणि इज्जतघर लवकरात लवकर कसे मिळेल, यावर मी लहानपणापासूनच विचार करत आहे आणि त्यासाठी प्रयत्नशील आहे.
मित्रांनो, माझ्या या भावना देशातल्या प्रत्येक सामान्य व्यक्तीने समजल्या आणि त्याला पूर्ण सहयोग दिल्याचा मला आनंद वाटतो. यामुळे स्वातंत्र्याच्या 70 वर्षांत स्वच्छतेविषयीची जाणीव 40 टक्क्यांहून वाढून आज 98 टक्क्यांपर्यंत झाली आहे. साडेचार वर्षांमध्ये 10 कोटींहून अधिक शौचालये बांधण्यात आली आहेत,6जिल्ह्यांतली 5 लाख गावे हागणदारीमुक्त झाली आहेत.
मित्रांनो, स्वच्छ भारत मोहीमेमुळे महिलांना अपमान आणि त्रासातून मुक्ती तर मिळालीच आहे, तर हे रोजगाराचेही मोठे माध्यम सिध्द झाले आहे. या मोहीमेमुळे जवळपास 45 लाख लोकांना रोजगार मिळाल्याचा अंदाज आहे. आपल्याकडे पहिले राज मिस्त्रीची परंपरा होती, या मोहीमेमुळे आता राणी मिस्त्रीही झाल्या आहेत आणि या राणी मिस्त्रींना अधिक सशक्त करण्यात आले आहे.कारण शौचालय बांधण्याच्या प्रशिक्षणाचा, अनुभवाचा, ज्ञानाचा, कौशल्याचा वापर ते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आपले किंवा दुसऱ्यांचे घर बांधण्यासाठीही करु शकतात.
मित्रांनो, तुमच्या प्रयत्नांमुळे आज स्वच्छ भारत मोहीम एका मुख्य टप्प्यावर आहे. या वर्षी 2 ऑक्टोबरला बापूंची 150 वी जयंती आपण साजरी करणार आहोत. तेव्हा त्यांनी दिलेले स्वच्छ भारताचे वचनही पूर्ण करणार असून, यात महिला शक्तीच्या नेतृत्वाची मोठी भूमिका आहे.
जी शौचालये बांधली आहेत, त्यांचा वापर व्हावा, स्वच्छतेचे गावांगावामध्ये, घराघरांमध्ये संस्कार व्हावे, याची आता आपल्याला काळजी करायची आहे. आपल्यातल्या अनेक भगिनी आपल्या गावच्या सरपंच आहेत,पंचायतीच्या सदस्य आहेत, बचत गटाशी संबंधित आहेत, तसेच अंगणवाडी आणि आशा सेविका आहेत.
स्वच्छ भारतासाठी कठीण परिस्थितीत सुध्दा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करतांना तुम्ही केलेल्या प्रयत्नांची आणि संघर्षांची मला कल्पना आहे. जसे, जम्मू-काश्मीरमधल्या अलीना गावातल्या नसीमा बेगम यांनी घरा-घरात शौचालय बांधण्यासाठी गावातल्या लोकांना प्रेरित केले आहे.गावातल्या लोकांनी त्यांच्या या कार्यामुळे त्यांना गावाच्या सरपंच म्हणून निवडून दिले आहे.
तसेच मध्य प्रदेशच्या श्रीमती नाराजींनी सोनी जिल्ह्यातल्या 21 गावांना हागणदारी मुक्त केले आहे. इथे उपस्थित सर्व बंधु-भगिनींच्या अशाच कार्याचे मी अभिनंदन करतो. तुम्ही सगळ्यांनी एकमेकांच्या काम करण्याच्या पध्दतींची माहिती घेऊन, त्यावर चर्चा करत त्यातून शिकण्याचा प्रयत्न करावा, असा आग्रह मी तुम्हाला करतो. यातून तुम्हाला आपल्या क्षेत्रातल्या स्वच्छ भारत मोहीमेला अधिक गती देण्यासाठी तसेच उत्तम परिणामांसाठी नवीन विचार, अनुभव आणि कल्पना मिळतील.
मित्रांनो, स्वच्छतेचा थेट संबंध आरोग्याशी आहे आणि गरीब कुटुंबांना याचा विशेष लाभ मिळत आहे. स्वच्छतेमुळे अतिसारासारख्या घातक आजारापासून मुलांना वाचवणे शक्य होत आहे. WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालानुसार स्वच्छ भारत मोहिमेमुळे 3 लाख लोकांचे प्राण वाचवणे शक्य झाले आहे. आपण एकाचे प्राण वाचवले तर जन्माचे पुण्य मिळते, तुम्ही तर 3 लाख लोकांचे प्राण वाचवत आहात म्हणजे तुम्हाला किती जन्माचे पुण्य एकत्र मिळत आहे.
मित्रांनो, आरोग्य गरीबांचे असो किंवा मध्यम वर्गीयांचे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकार इतक्या व्यापक प्रमाणात प्रयत्न करत आहे. मोठ्या रुग्णालयांची उभारणी, गरीबांना विनामूल्य उपचार देणाऱ्या जगातल्या सर्वात मोठ्या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत देशभरातल्या गावातील दीड लाख आरोग्य केंद्रांची मोहीम यासंदर्भात एकत्रित कामे होत आहेत.
मित्रांनो,हरियाणामध्ये राष्ट्रीय कर्करोग संस्थेसह,आरोग्य शिक्षणाशीसंबंधित 5 संस्थांचे लोकार्पण, उद्घाटन आणि पायाभरणी झाली आहे.2 हजार कोटी रुपयांच्या खर्चातून उभारलेली राष्ट्रीय कर्करोग संस्था हे देशातले सर्वात मोठे रुग्णालय प्रकल्प आहे.इथे कर्करोगासारख्या गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्याच प्रमाणे कुरुक्षेत्रमध्ये श्रीकृष्णा आयुष युनिवर्सिटी आणि पंचकूला मधल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद यांच्या उभारणीमुळे आयुर्वेदातल्या आपल्या प्राचीन उपचार पद्धतींना बळ मिळणार आहे. त्याबरोबर करनाल इथल्या पंडित दीनदयाळ हेल्थ सायन्स युनिवर्सिटी मध्ये आरोग्यासंबंधित संशोधन होणार आहे. फरीदाबाद इथल्या ईएसआयसी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातून श्रमिक बंधू आणि भगिनींना उपचाराच्या चांगल्या सुविधा मिळणार आहेत.
मित्रांनो, केंद्र सरकार देशात मोठ्या रुग्णालयांचे जाळे किती वेगाने पसरवत आहे, याचा अंदाज यावरुन घेता येईल. आज देशात 21 एम्सवर काम होत आहे किंवा त्याच्या निर्माणाविषयी काम सुरु आहे. यातल्या 14 एम्सवर 2014 सालानंतर काम सुरु झाले, तसेचहरियाणातल्या रिवाडी येथे आणखी एका एम्सची उभारणी होणार असल्याचा मला आनंद होत आहे.
मलेठी इथल्या जागरुक जनतेने या एम्ससाठी जमीन उपलब्ध करुन दिली असून, त्याचे काम लवकरच सुरु होणार आहे, त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो.
मित्रांनो, चांगल्या आणि मोठ्या रुग्णालयांबरोबर प्रधानमंत्री जन औषधी केंद्रांवर स्वस्त दरात औषधे उपलब्ध केली जात आहेत. गुडघा आणि हृदयाच्या शस्त्रक्रियाही खुप कमी दरात केल्या गेल्या आहेत. मूत्रपिंडांच्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात विनामूल्य डायलिसिसिची सुविधा देण्यात आली आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत देशभरातल्या जवळपास 50 कोटी कुटुंबांना 5 लाखापर्यंतचे उपचार विनामूल्य मिळत आहेत. ही योजना लागू होऊन 150 दिवस पण झाले नाहीत,तर आतापर्यंत 11 लाखांहून अधिक गरीबांना या योजनेअंतर्गत उपचार सुविधा मिळाल्या आहेत.
मित्रांनो, हरियाणा जय जवान आणि जय किसानचे राज्य आहे, त्यामुळे नारी शक्ती विषयी बोलतांना मी कृषी क्षेत्राविषयी न बोलणे योग्य नाही. कारण महिलांच्या योगदानाशिवाय या क्षेत्राची कल्पनाच करु शकत नाही. या वर्षीच्या अर्थसंकल्पात देशाच्या कृषी क्षेत्रासाठी खुप मोठ्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री कृषी योजनेअंतर्गत 5 एकरहून कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. ही रक्कम प्रत्येकी 2 हजार रुपये अशा तीन टप्प्यात देण्यात येणार असून,त्याचा पहिला हप्ता लवकरच देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मित्रांनो, गावाचे, गरीबांचे, शेतकऱ्यांचे, मध्यम वर्गीयांचे जीवन सोपे आणि सुलभ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. साडेचार वर्षांपूर्वी तुम्ही सगळ्यांनी मजबूत आणि बहुमताच्या सरकारसाठी आपल्या मताचा सदुपयोग केल्यामुळे आज ही कामे इतक्या मोठ्या स्तरावर आणि वेगाने होत आहेत.
आपल्या देशात प्रामाणिक व्यवस्थेसाठी तुम्ही मत दिले होते. तुमच्या त्याच विश्वासावर गरीबांचा हक्क लुटणाऱ्यांना आणि मध्यस्थांना सगळ्या व्यवहारांमधून बाजूला करण्यात आले आहे. आज देशातल्या प्रत्येक प्रामाणिक व्यक्तीला माझ्यावर विश्वास आहे, पण भ्रष्ट व्यक्तीला माझा त्रास होत आहे. हरियाणातही तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे काहींना घाम फुटतो आहे हे तुम्हाला दिसत असेल.
मित्रांनो, भ्रष्टाचारातले हे सगळे चेहरे तपास यंत्रणांना, कोर्टाला आणि मोदींना शिव्या देण्याच्या स्पर्धेत आहेत. त्यांच्या या धमक्यांना आणि शिव्यांना मी घाबरणार नाही, थांबणार नाही आणि वाकणारही नाही. देशाला भ्रष्टाचारापासून मुक्ती देणारी आमची सफाई मोहीम आणखी वेगाने काम करणार आहे, त्यासाठी तुमचे आशिर्वाद सदैव राहू देत.नुकत्याच तुमच्या राज्यात झालेल्या कुंभमेळ्यात गंगा नदीत शाही स्नानासाठी जवळपास 17 कोटी लोक जगभरातून आले होते.इतका मोठा जनसमुदाय असूनही स्वच्छतेविषयीच्या निकषांमध्ये जराही हलगर्जीपणा होऊ दिला नाही.कुंभमेळ्यातून आलेल्या लोकांकडून याची गावागावात चर्चा होत आहे. अमेरिकेतल्या एका न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्रात कुंभमेळ्याविषयी लेख लिहिला, त्यात इथल्या स्वच्छतेविषयी खुप कौतुक केले आहे. हे हिंदुस्तानचे चित्र बदलत असल्याची चिन्हे आहेत.
कुंभमेळ्यात दिवस-रात्र काम करणाऱ्या स्वच्छताकर्मींना मी आज कुरुक्षेत्रच्या भूमीवरुन आदराने वंदन करतो.आखाडे, संतसमाज, साधु महात्मा यांनीही कुंभमेळ्यात आपल्या व्याख्यानातून आणि प्रवचनातून वारंवार स्वच्छतेविषयी जागृत केले. स्वच्छता मोहीमेला साधु संतांचे आशीर्वाद मिळणे ही सुध्दा एक गौरवाची बाब आहे. त्या संत महात्मांना आणि ऋषीमुनींना मी आदराने वंदन करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो.
बंधू आणि भगिनींनो तुम्ही देशाच्या कानाकोपऱ्यातून आला आहात, तुमचे आशीर्वाद सदैव राहोत,अशी कामना करत मी माझे भाषण संपवतो. पुन्हा एकदा मी स्वच्छ शक्ती पुरस्कार जिंकलेल्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.
खूप खूप धन्यवाद.
B.Gokhale/S.Patil/P.Kor
नाइजीरिया का एक डेलीगेशन यहां मैं सामने देख सकता हूं।
— PMO India (@PMOIndia) February 12, 2019
I am told that you are here on a study tour since the past week to learn how the Swachh Bharat Mission achieved such dramatic success so quickly, and how it can be replicated in Nigeria. I sincerely wish you all success: PM
हरियाणा की धरती से हमने जो भी बड़े लक्ष्य तय किए, वो हासिल किए
— PMO India (@PMOIndia) February 12, 2019
वन रैंक, वन पेंशन का वादा यहीं से किया था और जो पूरा किया
बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ की योजना यहीं से लॉन्च की थी और ये पूरे देश में जन आंदोलन के रूप में फैल गई
आयुष्मान भारत की पहली लाभार्थी भी हरियाणा की बिटिया है: PM
आज स्वास्थ्य और संस्कृति से जुड़ी परियोजनाओं का लोकार्पण और शिलान्यास किया गया है।
— PMO India (@PMOIndia) February 12, 2019
झज्जर का नेशनल कैंसर इंस्टीट्यूट,
कुरुक्षेत्र में आयुष यूनिवर्सिटी,
करनाल में हेल्थ साइंस यूनिवर्सिटी,
पंचकुला में नेशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद,
फरीदाबाद में ESIC मेडिकल कॉलेज और अस्पताल: PM
ये तमाम प्रोजेक्ट हरियाणावासियों के जीवन को स्वस्थ और सुगम बनाने वाले हैं।
— PMO India (@PMOIndia) February 12, 2019
साथ ही यहां के युवाओं को रोज़गार के नए अवसर भी इन प्रोजेक्ट्स के माध्यम से मिलने वाले हैं: PM
बेटी बचाओ बेटी पढ़ाओ से बच्चियों की जनसंख्या में सुधार आया है,
— PMO India (@PMOIndia) February 12, 2019
उज्जवला योजना से बहनों को धुएं से मुक्ति मिली है,
राष्ट्रीय पोषण अभियान और प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान से प्रसूता माताओं के जीवन पर आने वाला खतरा कम हुआ है: PM
बेटियों पर बलात्कार जैसे अत्याचार करने वालों को फांसी तक की सज़ा का प्रावधान भी हमारी सरकार ने किया है।
— PMO India (@PMOIndia) February 12, 2019
प्रधानमंत्री आवास योजना के तहत जो घर दिए जा रहे हैं, उसमें भी महिलाओं के नाम घर की रजिस्ट्री हो, इसे प्राथमिकता दी जा रही है: PM
बेटियों को किचन के दायरे से बाहर योगदान देने के लिए प्रोत्साहित किया जा रहा है।
— PMO India (@PMOIndia) February 12, 2019
देश में पहली बार बेटियां फाइटर पायलट बनी हैं।
महिलाओं को अपने नवजात शिशुओं के अच्छी तरह लालन-पालन के लिए पर्याप्त समय मिल सके, इसके लिए मैटरनिटी लीव को 12 सप्ताह से बढ़ाकर 26 सप्ताह किया गया है: PM
मुद्रा योजना में 15 करोड़ ऋणों में से लगभग 75% ऋण महिला उद्यमियों को मिले हैं।
— PMO India (@PMOIndia) February 12, 2019
‘दीन दयाल अंत्योदय योजना’ के तहत लगभग 6 करोड़ महिलाएं स्वयं सहायता समूहों से जुड़ी हुई हैं।
ऐसे सेल्फ हेल्प गुप्स को 75 हजार करोड़ रुपए से अधिक ऋण उपलब्ध कराया गया है: PM
आज़ादी के लगभग 70 वर्षों में स्वच्छता का जो दायरा करीब 40% था, वो आज 98% तक पहुंच चुका है।
— PMO India (@PMOIndia) February 12, 2019
साढ़े 4 वर्षों में 10 करोड़ से अधिक टॉयलेट्स बनाए जा चुके हैं।
600 जिलों के साढ़े 5 लाख गांवों ने खुद को खुले में शौच से मुक्त कर दिया है: PM
स्वास्थ्य चाहे गरीब का हो या फिर मध्यम वर्ग के परिवार का, सरकार व्यापक रूप से प्रयास कर रही है।
— PMO India (@PMOIndia) February 12, 2019
चाहे बड़े अस्पतालों का नेटवर्क हो, देशभर के गांवों में डेढ़ लाख वेलनेस सेंटर बनाने का अभियान हो या फिर गरीब को मुफ्त इलाज देने वाली आयुष्मान भारत, एक साथ अनेक काम हो रहे हैं: PM
केंद्र सरकार देश में बड़े अस्पतालों का नेटवर्क किस तेज़ी से बिछा रही है,
— PMO India (@PMOIndia) February 12, 2019
इसका अंदाज़ा इसी बात से लगाया जा सकता है कि आज 21 AIIMS देश में या तो काम कर रहे हैं या फिर निर्माण का कार्य चल रहा है।
इनमें से 14 एम्स पर काम 2014 के बाद शुरु हुआ है: PM
The Swachh Shakti- 2019 in Haryana’s Kurukshetra was a wonderful occasion to honour the outstanding people who are making the Swachh Bharat Movement stronger at the grassroots level.
— Narendra Modi (@narendramodi) February 12, 2019
In Kurukshetra, also inaugurated and laid foundation stones for various development works. pic.twitter.com/M8p9WXzISm
In Kurukshetra today, I had the opportunity to see glimpses of some of the toilets that have been painted.
— Narendra Modi (@narendramodi) February 12, 2019
I was impressed, both by the dexterity of the artists and the passion towards cleanliness.
Such awareness and efforts add valuable strength to the Swachh Bharat Mission. pic.twitter.com/BDLPxiZbjH