Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

हवाई दलात तेजस लढाऊ विमानाचा समावेश झाल्याबद्दल पंतप्रधानाकडून अभिमान आणि आनंद व्यक्त


पंतप्रधान नरेंद्र मोदी हवाई दलात तेजस लढाऊ विमान दाखल झाल्याबद्दल अभिामान आणि आनंद व्यक्त केला आहे. तेजसच्या समावेशाबद्दल पंतप्रधानांनी हिंदुस्थान एअरोनॉटिकल लिमिटेड (एचएएल) आणि एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए) चीही प्रशंसा केली आहे.

हवाई दलात स्वदेशी बनावटीच्या तेजस लढाऊ विमानांच्या समावेशामुळे आमच्या हृदय अभिमानाने आणि आनंदाने भरुन गेली आहेत.

“तेजस लढाऊ विमानांच्या समावेशाबद्दल मी एचएएल आणि एडीए यांची प्रशंसा करतो. स्वदेशी संरक्षण सामुग्री निर्मितीला चालना देणाऱ्या आमच्यातील शक्ती आणि कौशल्य यांचे हे उत्तम उदाहरण आहे”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

J.Patnakar/B.Gokhale