पीएम्इंडिया
हुगली डॉक ॲन्ड पोर्ट इंजिनिअर्स लिमिटेड (एचडीपीईएल) च्या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित स्वेच्छानिवृत्ती योजनेला तसेच जॉईंट व्हेंचरद्वारे कंपनीची पुनर्रचना करायला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. आयडीए 2007 च्या वेतनश्रेणीवर आधारित या सुधारित स्वेच्छा निवृत्ती योजनेचे पॅकेज राहील. ही सुधारित स्वेच्छा निवृत्ती योजना तीन महिन्यांसाठी खुली राहील आणि एक महिन्याच्या मुदतवाढीची तरतूद यात असेल. सुधारित स्वेच्छा निवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीनंतर खाजगी क्षेत्राशी जाँईट व्हेंचरचा प्रयत्न करण्यात येईल तो अयशस्वी ठरल्यास कंपनीची निर्गुंतवणूक करण्यात येईल.
सुधारित स्वेच्छा निवृत्ती योजनेमुळे एचडीपीईएल च्या मनुष्यबळात मोठया प्रमाणात कपात होईल आणि आकारमानही त्यामुळे कमी होईल. त्यानंतर एचडीपीईएल पुनर्रचनेसाठी योग्य होईल. सध्याचे स्वेच्छा निवृत्तीचे पॅकेज जुन्या सुधारित पूर्व श्रेणीवर आधारित आहे, सुधारित स्वेच्छा निवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीमुळे एचडीपीईएलचे जे कर्मचारी या योजनेचा पर्याय स्वीकारतील त्यांना चांगले निवृत्तीवेतन लाभ मिळू शकतील. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या कल्याण साधण्याबरोबरच सरकारी तिजोरीचे वारंवार होणारे नुकसानही टाळता येणार आहे.
N.Chitale/S. Tupe