पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने २०१७-१८ दरम्यान ४,१०,००० मतदान यंत्रे (बीयु) आणि ३,१४,००० नियंत्रण यंत्रे (सीयु) आणि २०१८-१९ दरम्यान ४,३५,३०६मतदान यंत्रे (बीयु) आणि ७१,७१६ नियंत्रण यंत्रे (सीयु) प्रत्येकी ७,७०० रुपये आणि ९,३०० रुपये अंदाजे दराने खरेदी करण्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. एकूण अंदाजित खर्च १००९.६कोटी रुपये येईल. बंगलोरच्या भारत इलेक्ट्रॉनिक लि. आणि हैद्राबादच्या इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. च्या माध्यमातून ही खरेदी केली जाणार आहे.
यामुळे २०००-२००५ दरम्यान खरेदी केलेली अप्रचलित इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे बाद करता येतील. निवडणूक आयोगाला आवश्यक प्रमाणात खरेदी करण्याचे अधिकार दिल्यामुळे खरेदी प्रक्रिया सुलभ होईल आणि वेळेवर यंत्रे मिळतील.
B.Gokhale/S.Kane/Anagha