Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

2015 नंतरच्या विकासाच्या मसुद्याचा स्वीकार करण्यासंदर्भातल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिखर परिषदेत पंतप्रधान भाषण करणार


2015 नंतरच्‍या विकासासाठीच्या मसुद्याच्या स्वीकारासंदर्भातल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबरला भाषण करणार आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव बान की मून यांची पंतप्रधान भेट घेणार आहेत.

जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम योंग किम यांनाही पंतप्रधान भेटणार आहेत.

दिवसभरात पंतप्रधान अनेक महत्वपूर्ण द्विपक्षीय बैठका घेणार असून जॉर्डनचे राजे, भूतानचे पंतप्रधान, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष, स्वीडनचे पंतप्रधान, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष तसंच सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांची पंतप्रधान भेट घेणार आहेत.

N.Chitale/S.Tupe