Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदार पावतीची सुविधा असलेल्या इविएम ची खरेदी करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


2019 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदाराना मतदार पावती देण्याची सुविधा असलेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे खरेदी करण्याच्या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली .

• या अंतर्गत , 16,15,000 इविएम यंत्रे खरेदी केली जाणार असून एका यंत्राची अंदाजे किंमत 19,650 रुपये असेल. या खरेदीसाठी एकूण 3173.47 कोटी रुपये निधी अपेक्षित आहे. 2017-18 आणि 18-19 या वर्षात, बंगलोरच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स हैदराबादच्या इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपन्याकडून ही खरेदी केली जाणार आहे.

• दर विषयक वाटाघाटी करणाऱ्या समितीला दोन्ही संबंधित कंपन्यांशी चर्चा करून एक यंत्राची अंतिम किंमत निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

• एवीएम आणि मतदार पावती युक्त एवीएम ची २०१७-१८ मध्ये होणारी खरेदी आणि इतर कामांसाठी १६०० कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीलाही मंजुरी देण्यात आली आहे.

• दोन्ही उत्पादन कंपन्यांना निवडणूक आयोगातर्फे या यंत्राच्या खरेदीसाठी वेळेत ऑर्डर दिली जाईल, ज्याद्वारे सप्टेंबर २०१८ पर्यंत वीवीपीएटी यंत्रे उपलब्ध होऊ शकतील.

या निर्णयामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाला २०१९ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत वीवीपीएटी म्हणजेच मतदान पावती देण्याची सुविधा असलेली यंत्रे वापरता येतील. आपण ज्यांना मतदान केले त्यानाच ते गेले आहे की नाही हे मतदाराला यातून तपासता येओल . तसेच मतदान प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल आणि मतदारांच्या सर्व शंकाकुशंकांचे निरसन होऊ शकेल. सर्वोच्च न्यायालयाने ८ ऑक्टोबर २०१३ ला दिलेल्या आदेशाचे पालन करणारा हा निर्णय आहे.

N.Sapre/ R.Aghor/P.Malandkar