Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी उपराष्ट्रपती थिरू सी. पी. राधाकृष्णन यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल व्यक्त केली कृतज्ञता


नवी दिल्‍ली, 10 जून 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उपराष्ट्रपती थिरू सी. पी. राधाकृष्णन यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. देशाच्या जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद आपल्याला राष्ट्रसेवेसाठी अधिक कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा देतात, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

एक समृद्ध आणि आपल्या नागरी सांस्कृतिक वारशाचा अभिमान असलेला असा विकसित भारत घडवण्याच्या उद्देश साध्य करण्याच्या दिशेनेच आपले सर्व प्रयत्न यापुढे चालू राहतील, असेही त्यांनी नमूद केले आहे. देशातील नागरिकांची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही, अशी ग्वाही देखील पंतप्रधानांनी दिली आहे.

यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश :

आपल्या मनःपूर्वक शुभेच्छांबद्दल धन्यवाद, उपराष्ट्रपती थिरू सी. पी. राधाकृष्णन जी. देशाच्या जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद मला राष्ट्रसेवेसाठी अधिक कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा देतात. माझे सर्व प्रयत्न हे समृद्ध आणि आपल्या नागरी सांस्कृतिक वारशाचा अभिमान असलेला विकसित भारत घडवण्याचा उद्देश साध्य करण्याच्या दिशेनेच पुढे चालू राहतील. आपल्या देशबांधवांची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही.

 

* * *

शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai