पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NVS-03 उपग्रह घेऊन जाणाऱ्या GSLV-F18च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोमधील भारतीय शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन केले.
पंतप्रधान म्हणाले की, ही मोहीम भारताची स्वदेशी उपग्रह नेव्हिगेशन प्रणाली- ‘नाविक’, अधिक बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. प्रगत क्षमतांनी सज्ज असलेला NVS-03 उपग्रह, महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भर होण्याच्या भारताच्या प्रयत्नांना अधिक गती देईल आणि नागरिकांच्या हिताच्या नेव्हिगेशन सेवा अधिक सक्षम करेल.
मोदी यांनी भारतीय अंतराळ शास्त्रज्ञांच्या समर्पण आणि कल्पकतेचे कौतुक केले. त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीचा देशाला अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले.
मोदी यांनी ‘X’ वर पोस्ट केले:
NVS-03 उपग्रह घेऊन जाणाऱ्या GSLV-F18 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोमधील आमच्या शास्त्रज्ञांचे आणि अभियंत्यांचे अभिनंदन!
ही मोहीम आपली स्वदेशी उपग्रह नेव्हिगेशन प्रणाली, ‘नाविक’ अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. प्रगत क्षमतांनी सज्ज असलेला NVS-03 उपग्रह, महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भर बनण्याच्या आपल्या प्रयत्नांना अधिक बळ देईल आणि आपल्या नागरिकांसाठी उपयुक्त अशा नेव्हिगेशन सेवांना मदत करेल.
आपल्या अंतराळ शास्त्रज्ञांचे समर्पण आणि कल्पकता देशाला सतत अभिमान वाटायला लावणारी आहे.
@isro
Congratulations to our scientists and engineers at ISRO on the successful launch of GSLV-F18 carrying NVS-03.
This mission marks an important step in strengthening NavIC, our indigenous satellite navigation system. Equipped with enhanced capabilities, NVS-03 will further our pursuit of self-reliance in critical technologies and support navigation services that benefit our people.
The dedication and ingenuity of our space scientists continue to make our nation proud.
@isro
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2026
***
शिल्पा पोफळे/सुषमा काणे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
Congratulations to our scientists and engineers at ISRO on the successful launch of GSLV-F18 carrying NVS-03. This mission marks an important step in strengthening NavIC, our indigenous satellite navigation system. Equipped with enhanced capabilities, NVS-03 will further our pursuit of self-reliance in critical technologies and support navigation services that benefit our people. The dedication and ingenuity of our space scientists continue to make our nation proud. @isro
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2026