पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आर्मेनियाचे पंतप्रधान महामहिम निकोल पाशिन्यान यांची आज किर्गिझ प्रजासत्ताकातील बिश्केक येथे 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट झाली. या वर्षी जूनमध्ये आर्मेनियात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर पंतप्रधान निकोल पाशिन्यान यांची पुन्हा पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान पाशिन्यान यांची ही पहिलीच भेट होती.
पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान पाशिन्यान यांचे निवडणुकीतील विजयाबद्दल आणि पुन्हा पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले. दोन्ही नेत्यांनी संरक्षण, आर्थिक, औषधनिर्माण, खनिकर्म, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याबद्दल चर्चा केली. अलीकडे दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय सहकार्यात झालेल्या उल्लेखनीय प्रगतीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आणि दोन्ही देशांमधील विशेष स्नेह आणि मैत्रीच्या माध्यमातून हे बंध अधिक दृढ करण्याप्रति वचनबद्धता व्यक्त केली.
दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीसह प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही चर्चा केली. या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा अधोरेखित केली.
पंतप्रधान पाशिन्यान यांनी आर्मेनिया-अझरबैजान शांतता कराराच्या अंमलबजावणीच्या सद्यस्थितीबाबत पंतप्रधान मोदी यांना माहिती दिली.
दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये सहकार्याला पुढे नेण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यास सहमती दर्शवली.
* * *
सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
PM @narendramodi held a wonderful meeting with PM @NikolPashinyan of Armenia on the sidelines of the SCO Summit in Bishkek. The leaders discussed expanding cooperation in defence, space, IT, education, pharmaceuticals and other areas, along with strengthening trade and investment… pic.twitter.com/tbzfWxQgHb
— PMO India (@PMOIndia) August 31, 2026
A wonderful meeting with Prime Minister of Armenia, Mr. Nikol Pashinyan on the sidelines of the SCO Summit in Bishkek.
— Narendra Modi (@narendramodi) August 31, 2026
India-Armenia cooperation is all set to grow in defence, IT, space, education, pharmaceuticals and more.
We are equally certain to deepen trade and… pic.twitter.com/y2W7ToY5GB