Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नवी दिल्ली येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी भेट

नवी दिल्ली येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी भेट


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 सप्टेंबर 2026 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या 18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष महामहिम सिरिल रामाफोसा यांची भेट घेतली.

दोन्ही नेत्यांनी विविध क्षेत्रांतील सहकार्यामध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला आणि भारत-दक्षिण आफ्रिका बहुआयामी धोरणात्मक भागीदारीवर विचारविनिमय केला. भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील घनिष्ठ आणि दीर्घकालीन संबंध सामायिक ऐतिहासिक संघर्ष, दृढ सांस्कृतिक, मजबूत आर्थिक आणि जनतेतील सखोल परस्पर संबंधांवर आधारित असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या विविध जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण केली आणि बहुपक्षीय मंचांवर घनिष्ठ समन्वय कायम ठेवण्यास सहमती दर्शवली. दक्षिण आफ्रिकेतून भारतात चित्त्यांचे यशस्वी स्थलांतर करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधानांनी दक्षिण आफ्रिकेला आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्समध्ये सहभागी होण्याबाबत निमंत्रण दिले.

राष्ट्राध्यक्ष रामाफोसा यांनी पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे केलेले मनःपूर्वक स्वागत तसेच ब्रिक्स शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

***

शैलेश पाटील/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]