Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी दिल्या नुआखाई निमित्त शुभेच्छा


नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुआखाई सणानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी म्हणाले की, नुआखाई हा शेतकरी, नवीन पीक आणि एकतेची भावना यांचा उत्सव आहे. हा विशेष प्रसंग समाजात सलोखा आणि एकतेची भावना अधिक दृढ करेल, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली.

पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिले आहे की,

नुआखाई जुहार!

शेतकरी, नवीन पीक आणि एकतेची भावना यांचा उत्सव असलेल्या नुआखाई निमित्त हार्दिक शुभेच्छा.

हा विशेष प्रसंग सलोख्याचे बंध दृढ करो आणि आपल्या समाजात सुख व समृद्धी घेऊन येवो.

राधिका अघोर/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai