Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी राष्ट्रीय एचपीव्ही लसीकरण मोहिमेचे कौतुक केले


नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय एचपीव्ही लसीकरण मोहिमेचे कौतुक केले आहे. या मोहिमेने नऊ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 1 कोटी एचपीव्ही लसींच्या मात्रा देण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला असून, याद्वारे पात्र मुलींच्या वार्षिक गटापैकी सुमारे 87% मुलींचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

मोदी यांनी नमूद केले की, ही कामगिरी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेद्वारे भारतातील मुलींसाठी अधिक निरोगी भविष्य घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. हे यश  म्हणजे या मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी सुनिश्चित करणाऱ्या  सर्व संबंधित घटकांच्या सामूहिक वचनबद्धतेचे आणि समन्वित प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे, 

मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले:

प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेच्या दिशेने आमच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा.

प्रत्येक मात्रा  हा मुलींचे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून  संरक्षण करण्याच्या आणि त्यांच्यासाठी अधिक निरोगी भविष्य सुनिश्चित करण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.

ज्यांच्या प्रयत्नांमुळे ही उल्लेखनीय कामगिरी शक्य झाली आहे अशा सर्व संबंधित घटकांचे मी अभिनंदन करतो.

निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai

 

 

 

Prime Minister shares Sanskrit Subhashitam highlighting essential qualities that sustain prosperity