पीएम्इंडिया
१४ ऑक्टोबर २०१५ ला अधिसूचित करण्यात आलेल्या आणि शोध घेतलेल्या लहान क्षेत्र धोरणाची व्याप्ती, लहान क्षेत्र धोरण बोली फेरी 11 अंतर्गत 60 लहान क्षेत्र आणि बिगर मौद्रिकी साठ्यांपर्यंत वाढवायला मंत्री मंडळाने मान्यता दिली आहे. यापैकी 22 क्षेत्रे तेल आणि नैसर्गिक वायू महा मंडळाची, 5 ऑईल इंडिया लिमिटेड, नव्या शोध आणि परवाना धोरणानुसार 12 त्याग करण्यात आलेली क्षेत्रे, यांचा यात समावेश आहे. याशिवाय डीएस एफ बोली फेरी 1 अंतर्गत देऊ करण्यात आलेली मात्र गुंतवणूकदारा कडून अपुरा प्रतीसाद मिळाल्यामुळे ठेका न दिलेली 21 क्षेत्रे आहेत.
तपशील
या साठ्यातून 194.65 दशलक्ष मेट्रिक टन तेल किवा तितकाच वायू साठा अपेक्षित आहे.
या क्षेत्रांचा विकास वेगाने करण्यात येणार असून त्यामुळे तेल आणि वायू उत्पादनात वृद्धी होऊन देशाची उर्जा सुरक्षितता मजबूत व्हायला मदत होणार आहे.
हे धोरण भविष्यातल्या बोली फेरीसाठीही लागू करण्यात येत आहे.
BG/NC