Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अटलजींच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन करत पंतप्रधानांनी सामायिक केले संस्कृत सुभाषित


नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2025

 

माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमीत्त, त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावर एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे:

“यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः।

स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते॥”

श्रेष्ठ व्यक्ती जसे आचरण करते, सामान्य लोकही त्याचेच अनुसरण करतात. वेगळ्या शब्दांमध्ये मांडायचे तर, एखाद्या नेत्याचे किंवा अनुकरणीय व्यक्तीचे वर्तन समाजासाठी व अनुयायांसाठी मार्गदर्शक ठरत असते, असा या सुभाषिताचा अर्थ आहे.

अटलजींचे आचरण, शालीनता, वैचारिक दृढता व राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्यावर ठेवण्याचा संकल्प, भारतीय राजकारणासाठीचे एक आदर्श मापदंड आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. 

श्रेष्ठता ही पदाने नव्हे, तर आचरणाने प्रस्थापित होते व तीच समाजाला दिशा देते, हेच त्यांनी आपल्या जगण्यातून सिद्ध केले, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश :

आदरणीय अटलजींची जन्मजयंती आपल्या सर्वांसाठी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याची एक विशेष संधी आहे. त्यांचे आचरण, शालीनता, वैचारिक दृढता आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्यावर ठेवण्याचा संकल्प भारतीय राजकारणासाठी एक आदर्श मापदंड आहे. श्रेष्ठता ही पदाने नाही, तर आचरणाने प्रस्थापित होते आणि तीच समाजाला दिशा देते, हे त्यांनी आपल्या जगण्यातून सिद्ध केले.

या निमित्ताने मी हे सुभाषित सामायिक करत आहे, ज्यातून त्यांच्या जीवनाचा एक पैलू अधोरेखित होतो:

यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः।

स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते॥

 

* * *

शिल्पा नीलकंठ/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai