Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई खेळांमध्ये महिलांच्या 10,000 मीटर स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून सीमा यांचे अभिनंदन


नवी दिल्‍ली, 24 सप्‍टेंबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई खेळांमध्ये महिलांच्या 10,000 मीटर स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल सीमा यांच्याविषयी अभिमान व्यक्त केला आणि या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

त्यांच्या दृढनिश्चयी कामगिरीमुळे भारताला अनेक वर्षांनंतर या स्पर्धेत पदक मिळाले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. हे एक अप्रतिम यश असून त्यातून सहनशीलता, शिस्त आणि अनेक वर्षांचे कठोर परिश्रम दिसतात, असे मोदी यांनी नमूद केले. आगामी काळात त्यांनी आणखी अनेकदा यश संपादन करावे यासाठीही त्यांनी शुभेच्छा दिल्या.

‘एक्स’ वर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान कार्यालयाने नमूद केले: 

“आशियाई खेळांमध्ये महिलांच्या 10,000 मीटर स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल सीमा यांचा अभिमान आहे! त्यांचे अभिनंदन.

त्यांच्या दृढनिश्चयी कामगिरीने अनेक वर्षांनंतर भारताला या स्पर्धेत पदक मिळवून दिले आहे. हे एक उत्तम यश सहनशीलता, शिस्त आणि अनेक वर्षांचे कठोर परिश्रम दर्शवते.

त्यांना पुढील वाटचालीत आणखी यश मिळो या शुभेच्छा: PM @narendramodi”

 

* * *

सुवर्णा बेडेकर/निखिलेश चित्रे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai