Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उच्च शैक्षणिक संस्थांच्या भांडवली मालमत्ता निर्मितीसाठी उच्च शिक्षण, वित्तीय संस्थेच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी


महत्त्वपूर्ण शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने उच्च शिक्षण, वित्तीय संस्थेच्या स्थापनेला मंजूरी दिली आहे.

दोन हजार कोटी रुपयांच्या अधिकृत भांडवलासह निर्धारित निमंत्रक आणि मनुष्यबळ विकास मंत्रालय संयुक्तपणे या संस्थेचे निमंत्रक असतील. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि कॉर्पोरेट कंपन्यांद्वारे, कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी अंतर्गंत दिल्या जाणाऱ्या निधीलाही ही संस्था चालना देईल.

10 वर्षांच्या कर्जांच्या माध्यमातून ही संस्था नागरी आणि प्रयोगशाळा विषयक पायाभूत सुविधा प्रकल्पांना वित्त पुरवठा करेल.

B.Gokhale/M.Pange/Anagha