Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उत्तराखंडच्या टेहरी गढवाल इथे अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी केले दु:ख व्यक्त


नवी दिल्‍ली, 23 एप्रिल 2026

 

उत्तराखंडच्या टेहरी गढवाल इथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. या दु:खद घटनेत प्राण गमावलेल्या लोकांच्या कुटुंबियांचे त्यांनी सांत्वन केले आहे, तर जखमी झालेल्यांना लवकरात लवकर बरे वाटावी अशी प्रार्थना केली आहे.

या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसाठी, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये, तर जखमी लोकांसाठी 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले आहे :

“उत्तराखंडच्या टेहरी गढवाल इथे झालेल्या अपघातातील जीवितहानीचे वृत्त दु:खद आहे. या दु:खद घटनेत प्राण गमावलेल्या लोकांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या शोकसंवेदना व्यक्त करतो. तसेच, अपघातातील जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, हीच प्रार्थना.

या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना पीएमएनआरएफ अंतर्गत प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत दिली जाईल” पंतप्रधान @narendramodi”

 

* * *

निलिमा चितळे/राधिका अघोर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai