पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 26 मे 2026
जपानचे परराष्ट्रमंत्री तोशिमित्सू मोटेगी यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान मोदी यांनी हिंद-प्रशांत आणि त्यापलीकडील प्रदेशात शांतता, स्थैर्य आणि समृद्धीला चालना देण्यासाठी भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा पुनरुच्चार केला.
या प्रदेशाच्या आणि जगाच्या सामायिक हितासाठी भारत आणि जपान यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या महत्त्वावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.
पंतप्रधानांनी x वरच्या पोस्टमध्ये म्हटले;
“जपानचे परराष्ट्रमंत्री तोशिमित्सू मोटेगी यांचे स्वागत करताना आनंद झाला. हिंद-प्रशांत आणि त्यापलीकडच्या क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि समृद्धीला चालना देण्यासाठी भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा पुनरुच्चार केला.”
@moteging”
Delighted to receive Mr. Toshimitsu Motegi, Minister for Foreign Affairs of Japan. Reaffirmed the vital role of the India-Japan Special Strategic and Global Partnership in advancing peace, stability and prosperity across the Indo-Pacific and beyond.@moteging pic.twitter.com/39AB2xN6FD
— Narendra Modi (@narendramodi) May 26, 2026
निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com