Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी समावेशक विकास आणि विकसित भारतासाठी दृष्टिकोन याबाबतचा लेख केला सामायिक


नवी दिल्ली, 26 मे 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी लिहिलेला लेख सामायिक केला आहे.

अमृत काळात भारताची वाटचाल सुरू असताना, देशभरातल्या लोकांना विशेषतः नारीशक्ती, युवा आणि शेतकऱ्यांना लाभकारी ठरलेल्या सरकारच्या विविध उपक्रमांचे प्रतिबिंब या लेखात उमटले आहे. स्वामी विवेकानंद, थिरुवल्लुवर आणि सुब्रमण्य भारती यांच्यापासून प्रेरणा घेत, वर्ष 2047 पर्यंत ‘विकसित भारत’घडवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत, असे आवाहन या लेखात करण्यात आले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने एक्सवर पोस्ट केले आहे; 

“भारत अमृतकाळाकडे वाटचाल करत असताना माननीय @VPIndia Thiru @CPR_VP यांनी देशभरातल्या लोकांना विशेषतः नारीशक्ती, युवा आणि शेतकऱ्यांना लाभकारी ठरलेल्या सरकारच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला आहे. 

स्वामी विवेकानंद, थिरुवल्लुवर आणि सुब्रमण्य भारती यांच्यापासून प्रेरणा घेत, त्यांनी प्रत्येकाला 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.”

नेहा कुलकर्णी/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com