Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

झाम्बियाच्या राष्ट्राध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष हाकाइंडे हिचिलेमा यांचे अभिनंदन केले


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झाम्बियाच्या राष्ट्राध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष हाकाइंडे हिचिलेमा यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

झाम्बियासोबतच्या बहुआयामी भागीदारीला भारत अत्यंत महत्त्व देतो, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

राष्ट्राध्यक्ष हाकाइंडे हिचिलेमा यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि झाम्बिया यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छाही पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली.

पंतप्रधानांनी आपल्या ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की,

“झाम्बियाच्या राष्ट्राध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष हाकाइंडे हिचिलेमा यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

झाम्बियासोबतच्या बहुआयामी भागीदारीला भारत अत्यंत महत्त्व देतो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपले संबंध अधिक दृढ करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यास मी उत्सुक आहे.

*** 

नितीन फुल्लुके / राजेश शिरभाते/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai