Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तिरू वुम्मिडी एथिराज जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना सादर करण्यात आलेल्या ऐतिहासिक सेंगोलच्या निर्मितीमधल्या योगदानासाठी तिरू वुम्मिडी एथिराज यांचे नेहमी स्मरण केले जाईल, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.

2023 मध्ये नव्या संसद भवनात सेंगोलला सन्मानाचे स्थान देण्यात आले, त्या वेळी एथिराज यांची भेट घेण्याचा बहुमान मिळाल्याची आठवण पंतप्रधानांनी सांगितली. त्यांचे जीवन आणि कारागिरी भारताच्या गौरवशाली परंपरा आणि देशाचा राष्ट्रीय प्रवास यांच्यातील उल्लेखनीय दुवा दर्शवतात, असे त्यांनी नमूद केले. तसेच एथिराज यांच्या कुटुंबीयांविषयी आणि चाहत्यांविषयी त्यांनी मनःपूर्वक संवेदना व्यक्त केल्या.

पंतप्रधानांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे,

“तिरू वुम्मिडी एथिराज  जी यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. तामिळनाडूमधल्या एका प्रतिष्ठित कुटुंबातून आलेल्या एथिराज यांचे माजी पंतप्रधान नेहरू यांना सादर करण्यात आलेल्या ऐतिहासिक सेंगोलच्या निर्मितीतल्या योगदानासाठी नेहमी स्मरण केले जाईल.अनेक वर्षांनंतर, 2023 मध्ये आमच्या सरकारला नव्या संसद भवनात सेंगोलला सन्मानाचे स्थान देण्याचा मान मिळाला. त्या वेळी मला तिरू वुम्मिडी एथिराज यांची भेट घेण्याचा आणि आपल्या देशासाठी व संस्कृतीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा बहुमान लाभला.

त्यांचे जीवन आणि कारागिरी भारताची गौरवशाली परंपरा आणि आपला राष्ट्रीय प्रवास यांच्यातला उल्लेखनीय दुवा दर्शवतात. त्यांच्या कुटुंबीयांविषयी आणि चाहत्यांविषयी माझ्या मनःपूर्वक संवेदना. ओम शांती.”

***

Nilima Chitale / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai