पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे 18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान कझाकिस्तान प्रजासत्ताकाचे अध्यक्ष कासिम-जोमार्ट तोकायेव यांची भेट घेतली.
पंतप्रधान मोदी यांनी कझाकिस्तानसोबतच्या भारताच्या प्राचीन सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांचे े स्मरण केले आणि अलीकडच्या काळात भारत-कझाकिस्तान संबंधांमध्ये होत असलेल्या सातत्यपूर्ण प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. दोन्ही नेत्यांनी राजकारण, व्यापार, संरक्षण आणि सुरक्षा, संपर्क व्यवस्था, ऊर्जा, महत्त्वपूर्ण खनिजे, उदयोन्मुख तंत्रज्ञान, सर्जनशील अर्थव्यवस्था आणि जन-संपर्क यांसारख्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला. तसेच, त्यांनी प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवरही आपापले दृष्टिकोन मांडले.
आपल्या जनतेच्या परस्पर हितासाठी तसेच या प्रदेशातील शांतता, स्थैर्य, विकास आणि समृद्धीसाठी दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला.
***
सोनाली काकडे/राजेश शिरभाते/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]