Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांकडून उत्कल दिबसनिमित्त शुभेच्छा व्यक्त.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘उत्कल दिबसनिमित्त ओदिशाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ओडिसा हे राज्य सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महानतेचे एक अजरामर प्रतीक म्हणून ओळखले जाते, असे मोदी यांनी नमूद केले. ओदिशाच्या संगीत, कला आणि साहित्याने भारताला विविध प्रकारे समृद्ध केले आहे, असेही ते म्हणाले.ओदिशाचे लोक त्यांची जिद्द, साधेपणा आणि आपुलकीसाठी ओळखले जातात, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले आहे. येणाऱ्या काळात ओदिशा प्रगतीची नवनवीन शिखरे सर करत राहो, हीच सदिच्छा.
एक्स वर केलेल्या एका संदेशात पंतप्रधान म्हणाले की,
उत्कल दिबसच्या विशेष प्रसंगी हार्दिक शुभेच्छा. ओडिसा हे राज्य सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महानतेचे एक अजरामर प्रतीक म्हणून ताठ मानेने उभे आहे. ओडिया संगीत, कला आणि साहित्याने भारताला विविध प्रकारे समृद्ध केले आहे. ओडिसाचे लोक त्यांची जिद्द, साधेपणा आणि आपुलकीसाठी ओळखले जातात, त्यांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले आहे. येणाऱ्या काळात ओदिशा प्रगतीची नवनवीन शिखरे सर करत राहो.

***

 

NehaKulkarni / RajDalekar / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai