Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांचा गुजरात दौरा: सौराष्ट्र नर्मदा जलसिंचन प्रकल्पाचा प्रारंभ

पंतप्रधानांचा गुजरात दौरा: सौराष्ट्र नर्मदा जलसिंचन प्रकल्पाचा प्रारंभ

पंतप्रधानांचा गुजरात दौरा: सौराष्ट्र नर्मदा जलसिंचन प्रकल्पाचा प्रारंभ

पंतप्रधानांचा गुजरात दौरा: सौराष्ट्र नर्मदा जलसिंचन प्रकल्पाचा प्रारंभ


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सौराष्ट्र नर्मदा जलसिंचन प्रकल्पाच्या कामाचा आज प्रारंभ केला. गुजरातमधील सनसोरा या गावात झालेल्या एका कार्यक्रमात मोदी यांनी प्रकल्पाच्या स्मृतिफलकाचे अनावरण केले.

यावेळी पंतप्रधानांनी एजेआय-3 धरणाच्या स्थानाला भेट देऊन धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्याची पाहणी केली.

यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाण्याचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना जनसंवर्धनाची कामे केल्यामुळे त्याचा फायदा आता दिसून येत असून भूमी अंतर्गत जलस्तर वाढत आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. कच्छसारख्या वालुकामय प्रदेशात जवानांनाही पुरेसे पाणी मिळणे अवघड असे, मात्र आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

सौराष्ट्र आणि परिसराच्या दृष्टीने हा जलसिंचन प्रकल्प अतिशय महत्त्वपूर्ण आहे, असे सांगून सगळ्या क्षेत्रात जलसंवर्धनाचीही नितांत गरज आहे. सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कोणकोणत्या योजना राबवत आहे, याचाही उल्लेख पंतप्रधानांनी यावेळी केला.

उज्ज्वला गॅस योजना, एलईडी दिवे यामुळे लोकांच्या आयुष्यात गुणात्मक फरक पडला असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor