Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थिरु आर. नल्लाकन्नू यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक


नवी दिल्‍ली, 25 फेब्रुवारी 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थिरु आर. नल्लाकन्नू यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तळाच्या स्तरापर्यंत असलेला त्यांचा घट्ट संपर्क आणि वंचित घटकांना आवाज देण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांचा पंतप्रधानांनी विशेष उल्लेख केला.

थिरु आर. नल्लाकन्नू यांचा समाजातील प्रत्येक घटक मोठ्या प्रमाणात आदर करत होता आणि त्यांचा साधेपणा उल्लेखनीय होता, असे पंतप्रधानांनी नमूद केले. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि चाहत्यांप्रती आपल्या संवेदना असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे;

“थिरु आर. नल्लाकन्नू यांची तळागाळाशी जोडलेली नाळ तसेच वंचित, कामगार आणि शेतकरी वर्गाला आवाज देण्यासाठी केलेले प्रयत्न यासाठी ते कायम स्मरणात राहतील. समाजातील सर्व स्तरांतील लोक त्यांचा मोठा सन्मान करत होते. त्यांचा साधेपणाही तितकाच उल्लेखनीय होता. त्यांचे  कुटुंबीय  आणि चाहत्यांसमवेत माझ्या संवेदना आहेत.”

 

* * *

निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai