पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 18 मार्च 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतचे युवराज,महामहिम शेख सबाह अल-खालिद अल-हमाद अल-मुबारक अल-सबाह यांच्याशी आज दूरध्वनीव्दारे संवाद साधला. यावेळी त्यांनी ईद सणानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि प्रादेशिक सुरक्षाविषयक घडामोडींचा आढावा घेतला.
पंतप्रधानांनी कुवेतचे युवराज, शेख सबाह अल- खालिद अल-हमाद अल-मुबारक अल-सबाह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि आगामी ‘ईद’ सणाच्या शुभेच्छा दिल्या. या संभाषणादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युवराज यांनी पश्चिम आशियातल्या बदलत्या परिस्थितीबाबत विचारांची देवाणघेवाण केली आणि अलीकडील घडामोडींविषयी चिंता व्यक्त केली. कुवेतच्या सार्वभौमत्वावर आणि प्रादेशिक अखंडतेवर होणाऱ्या हल्ल्यांचा भारताने केलेला निषेधाचा पंतप्रधानांनी यावेळी पुनरूच्चार केला.तसेच ‘होर्मुझ सामुद्रधुनी’मधून सुरक्षित आणि मुक्त नौवहन सुनिश्चित करणे, याला आपले सर्वोच्च प्राधान्य असल्याचे ठामपणे सांगितले. प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेसाठी सातत्यपूर्ण राजनैतिक संवाद आणि सहभाग अत्यंत आवश्यक आहे, यावर उभय नेत्यांचे एकमत झाले. कुवेतमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय समुदायाच्या सुरक्षा आणि कल्याणासाठी दिल्या जाणाऱ्या निरंतर पाठिंब्याबद्दलही पंतप्रधानांनी युवराजांचे आभार मानले.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर लिहिले ;
“कुवेतचे युवराज, महामहिम शेख सबाह अल-खालिद अल-हमाद अल-मुबारक अल-सबाह यांच्याशी चर्चा केली आणि आगामी ‘ईद’ सणाच्या शुभेच्छा दिल्या.
आम्ही पश्चिम आशियामध्ये बदलत असलेल्या परिस्थितीबाबत विचारांची देवाणघेवाण केली आणि अलीकडील घडामोडींविषयी चिंता व्यक्त केली. कुवेतच्या सार्वभौमत्वावर आणि प्रादेशिक अखंडतेवर होणाऱ्या हल्ल्यांचा भारताने केलेला निषेधाचा यावेळी पुनरूच्चार केला.’होर्मुझ सामुद्रधुनी’मधून सुरक्षित आणि मुक्त नौवहन सुनिश्चित करणे, याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.
प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेसाठी सातत्यपूर्ण राजनैतिक संवाद अत्यंत आवश्यक आहे,यावर आमचे एकमत झाले.
कुवेतमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय समुदायाच्या सुरक्षा आणि कल्याणासाठी दिल्या जाणाऱ्या निरंतर पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानले.”
Spoke with HH Sheikh Sabah Al-Khaled Al-Hamad Al-Mubarak Al-Sabah, Crown Prince of Kuwait and conveyed greetings on the upcoming festival of Eid.
We exchanged views on the evolving situation in West Asia and shared concerns over recent developments. Reiterated India’s…
— Narendra Modi (@narendramodi) March 18, 2026
निलीमा चितळे/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Spoke with HH Sheikh Sabah Al-Khaled Al-Hamad Al-Mubarak Al-Sabah, Crown Prince of Kuwait and conveyed greetings on the upcoming festival of Eid.
— Narendra Modi (@narendramodi) March 18, 2026
We exchanged views on the evolving situation in West Asia and shared concerns over recent developments. Reiterated India’s…