Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि न्यूझीलंडमधील मुक्त व्यापार करार आणि त्याचे लाभ यांची मांडणी असलेला लेख केला सामायिक


नवी दिल्‍ली, 27 एप्रिल 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा लेख सामायिक केला आहे.

भारत आणि न्यूझीलंडमधील मुक्त व्यापार कराराअंतर्गत कशा रितीने भारताच्या निर्यातीवरील शुल्क हटेल, या करारामुळे देशातील श्रम प्रधान क्षेत्रांना कशा रितीने चालना मिळणार आहे तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाला कशी अधिक बळकटी मिळणार आहे, त्याचवेळी देशाची कृषी आणि दुग्धव्यवसायासारखी क्षेत्रे या करारांतर्गत कशी पूर्णपणे संरक्षित असणार आहेत याबद्दलची मांडणी या लेखात केली आहे. याव्यतिरिक्त, या करारामुळे कशारितीने देशातील विद्यार्थी आणि कुशल व्यावसायिकांसाठीच्या संधीही कशा रितीने विस्तारतील, कृषी उत्पादकता आणि गुंतवणुकीसंबंधीच्या वचनबद्धतेला कसे पाठबळ लाभले आहे या बाबीही या लेखात अधोरेखित केल्या गेल्या आहेत.

यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश,

भारत आणि न्यूझीलंडमधील मुक्त व्यापार कराराअंतर्गत कशा रितीने भारताच्या निर्यातीवरील शुल्क हटवेल, या करारामुळे देशातील श्रम प्रधान क्षेत्रांना कशा रितीने चालना मिळणार आहे तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाला कशी अधिक बळकटी मिळणार आहे, त्याचवेळी देशाची कृषी आणि दुग्धव्यवसायासारखी क्षेत्रे या करारांतर्गत कशी पूर्णपणे संरक्षित असणार आहेत याबद्दलची मांडणी @PiyushGoyal यांनी केली आहे.

या करारामुळे देशातील विद्यार्थी आणि कुशल व्यावसायिकां साठीच्या संधीही विस्तारल्या आहेत, त्याचवेळी, कृषी उत्पादकता आणि गुंतवणुकीसंबंधीच्या वचनबद्धतेलाही पाठबळ लाभले आहे.

 

* * *

निलिमा चितळे/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai