Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीमच्या 50 व्या राज्य स्थापना सोहळ्याची क्षणचित्रे सामायिक केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीमच्या 50 व्या राज्य स्थापना सोहळ्याची क्षणचित्रे सामायिक केली


नवी दिल्‍ली, 28 एप्रिल 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिक्कीमच्या  50 व्या राज्य स्थापना सोहळ्याची क्षणचित्रे सामायिक करताना  राज्याचा सांस्कृतिक वारसा, शाश्वत पद्धती आणि राष्ट्रीय विकासातील योगदानाबद्दल प्रशंसा केली.

एक्सवर केलेल्या पोस्टच्या मालिकेत पंतप्रधानांनी लिहिले;

“मी तुम्हाला, सिक्कीमच्या लोकांना, आश्वस्त करतो  की येथील लोकांचा स्नेह आणि आशीर्वाद यांची परतफेड करण्यात मी कोणतीही कसर सोडणार नाही.”

 

“सिक्कीममध्ये पर्यावरण-अनुकूल आरोग्य पर्यटनाची प्रचंड क्षमता आहे. आम्ही देशभरात पर्यटन विकासासोबतच यालाही प्रोत्साहन देत आहोत.

या संदर्भात माझे विशेष आवाहन आहे…”

 

“सिक्कीममधील युवकांना  खेळाची प्रचंड आवड असून त्यांनी मैदानावर आपल्या प्रतिभेचे दर्शनही घडवले आहे.

केंद्र सरकार त्यांना उत्तम सुविधा आणि चमकण्याची संधी देण्यासाठी  अनेक प्रकल्पांवर काम करत आहे.”

 

“आज जग शाश्वत जीवनशैलीबद्दल बोलत आहे. मला आनंद आहे की आपला ईशान्य भारत आणि विशेषतः सिक्कीम, या दिशेने  एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत आहे…”

 

“गंगटोकमध्ये सिक्कीमचा सांस्कृतिक वारसा अनुभवणे माझ्यासाठी अविस्मरणीय होते.

असे वाटले जणू काही संपूर्ण भारत एकाच कार्यक्रमात समाहित झाला होता. मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणाने ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची एक अद्भुत  झलक सादर केली.

या कार्यक्रमाशी संबंधित असलेल्या प्रत्येकाला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.”

“गंगटोकमधील उत्साह आणि प्रेमाने मला नवी ऊर्जा दिली. सिक्कीमच्या  50 व्या राज्य स्थापना दिनानिमित्त आयोजित सोहळ्याबद्दल मी माझ्या सिक्कीमच्या बंधू -भगिनीचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो. राष्ट्रीय विकासात सिक्कीमने दिलेल्या योगदानाचा भारताला खूप अभिमान आहे. सिक्कीमच्या लोकांनी अनेक क्षेत्रांमध्ये स्वतःला सिद्ध केले आहे आणि त्यांच्या उत्कृष्ट स्वभावासाठी ते प्रशंसनीय आहेत.”

 

“सिक्कीमच्या  50 व्या राज्यस्थापना दिन सोहळ्यातील आणखी काही क्षणचित्रे येथे पाहता येतील.”

 

* * *

शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai