Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश मधील वाराणसी येथील महिला संमेलनातील क्षणचित्रे सामायिक केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश मधील वाराणसी येथील महिला संमेलनातील क्षणचित्रे सामायिक केली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेश मधील वाराणसी येथील महिला संमेलनातील काही क्षणचित्रे सामायिक करत, नारी शक्तीचा प्रेरणादायी सहभाग आणि काशी नगरीच्या सातत्यपूर्ण विकासासह महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारच्या अतूट वचनबद्धतेवर भर दिला.

एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे:

“वाराणसी येथील महिला संमेलनात आपल्या नारीशक्तीचा सहभाग अत्यंत प्रेरणादायी होता.

आमच्या सरकारने भगिनी आणि मुलींना आपल्या धोरणांच्या केंद्रस्थानी ठेवले आहे. काशी मधील महिला परिषद म्हणजे महिलांचा सन्मान आणि विकासाचा एक उत्सवसुद्धा आहे.

उत्तर प्रदेश मध्ये बनास डेअरीशी निगडित लाखो भगिनी खूप उत्कृष्ट कार्य करत आहेत. आज या बहिणींच्या  बँक खात्यात थेट बोनस जमा होत आहे. मी या सर्व बहिणींना हार्दिक शुभेच्छा देतो.

देशातील बहिणी आणि मुलींनी, महिला आरक्षणाला खीळ घालणाऱ्या,  घराणेशाही जपणाऱ्या आणि तुष्टीकरण करणाऱ्या पक्षांचे दुष्ट मनसुबे ओळखले आहेत. आसाम, केरळ, पुदुचेरी, बंगाल आणि तामिळनाडूमध्ये झालेले विक्रमी मतदान हे त्यांना शिक्षा देण्यासाठी आहे.

दळणवळणीय जोडणी असो, आरोग्यसेवा परिसंस्था असो किंवा काशीच्या वारशाचे जतन असो, येथील लोकांचे आयुष्य अधिक सुखकर करण्यासाठी  आम्ही कोणतीही कसर सोडत नाही.” 

***

NehaKulkarni / BhaktiSontakke / RadhikaAghor / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai