पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 14 जून 2026 रोजी निस इथल्या व्हिला केरीलोस इथे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. या वर्षाच्या सुरुवातीला भारत आणि फ्रान्समधील संबंध विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर पोहचले आहेत. त्यानंतर दोन्ही नेत्यांची झालेली ही पहिलीच भेट आहे.
या बैठकीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांशी संबंधित विविध पैलूंवर सविस्तर चर्चा केली. द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या बाबतीत सर्वच पैलुंवर झालेली प्रगती आणि वाढलेल्या व्याप्तीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यासोबतच संरक्षण विषयक मंच आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या बाबतीत संयुक्त डिझाईन, सह विकास, आणि सह उत्पादनावर भर देत हे सहकार्य अधिक वृद्धींगत करण्यावरही दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी अंतराळ क्षेत्रातील परस्पर सहकार्याचा समृद्ध वारसा अधोरेखित केला. यासोबतच मानवी अंतराळ मोहीमा आणि अंतराळ परिस्थितीविषयक जागरूकता या क्षेत्रातील सहकार्य अधिक विस्तारण्याबाबतही चर्चा केली. अंतराळ क्षेत्राशी संबंधित खाजगी क्षेत्राच्या भागिदारीचा विस्तार करण्याच्या पर्यायांबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. नागरी अणुऊर्जेच्या क्षेत्रात, भारताच्या शांती कायद्यामुळे लहान आणि प्रगत मॉड्युलर रिएक्टर्ससह सहकार्याच्या नवीन संधी निर्माण झाल्या असल्याची दखलही दोन्ही नेत्यांनी घेतली.
हॉरिझॉन 2047 रोडमॅप या मार्गदर्शक आराखड्याअंतर्गत झालेल्या प्रगतीचा आढावाही दोन्ही नेत्यांनी घेतला. याअंतर्गत आर्थिक विकास, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, परस्पर देशांमधील प्रतिभावान व्यक्तींची ये-जा, तसेच परस्परांमधील सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याबाबतच्या तसेच त्यात वैविध्यता आणण्याच्या कल्पनाही दोन्ही नेत्यांनी मांडल्या. या संदर्भाने, त्यांनी द्विपक्षीय व्यापारातील सातत्यपूर्ण प्रगतीचीही दखल घेतली, आणि आगामी पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्यासाठी एक उच्चस्तरीय यंत्रणा स्थापन करण्याला मान्यता दिली. दोन्ही नेत्यांनी भारत – युरोपीय महासंघ मुक्त व्यापार करार लवकरात लवकर अंमलात आण्याचे आवाहन केले. या करारामुळे द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीचा विस्तार करण्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यासोबतच लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र, विमान वाहतूक तसेच रेल्वे क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याच्या पर्यायांवरही दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी भारतात कानपूर इथे सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्किलिंग इन एरोनॉटिक्स हे उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याच्या कराराचेही स्वागत केले. आर्थिक सुरक्षेवरील संवादाची स्थापना झाल्याचेही त्यांनी स्वागत केले तसेच, अत्यावश्यक खनिजांच्या पुरवठा साखळीअंतर्गतच्या लवचिकतेला बळकटी देण्यावर सहमती व्यक्त केली.
द्विपक्षीय संबंधांमध्ये नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाची मुख्य भूमिका आहे याची दखलपूर्ण नोंदही त्यांनी घेतली. या अनुषंगानेच दोन्ही देशांनी यासंदर्भातील भागीदारीला दीर्घकालीन दिशा देण्यासाठी नवोन्मेष मार्गदर्शक आराखडा 2030 स्विकारला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील सहकार्याचा विस्तार करण्यावरही चर्चा झाली. यासाठी भारत आणि फ्रान्समध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यकारी गट स्थापन करण्यावर त्यांनी सहमती व्यक्त केली.
आज दोन्ही नेत्यांनी निस इथे संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचे उद्घाटन केले, पॅरिसमधील विवाटेक या उपक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले, यामुळे अत्यूच्च तंत्रज्ञान (डीप टेक), सेमीकंडक्टर्स, कृषी तंत्रज्ञान, वैद्यकीय तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण आणि अंतराळ यांसारख्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमधील भागीदारी आणखी दृढ झाली आहे. फ्रान्समध्ये यूपीआयचा (UPI) सातत्याने होत असलेला विस्तार, तसेच दोन्ही देशांमधील नवोन्मेष परिसंस्थेतील संस्थांदरम्यान झालेल्या 19 करारांवर स्वाक्षरी झाल्याबद्दलही दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले.
दोन्ही नेत्यांनी जनतेमधील परस्पर संबंध दृढ करण्याच्या महत्त्वावर भर दिला. या संदर्भात, फ्रेंच विमानतळांवर भारतीय नागरिकांसाठी व्हिसा-मुक्त ट्रान्झिटची सुविधा तातडीने कार्यान्वित केल्याबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉं यांचे आभार मानले. याशिवाय, दोन्ही देशांमधील प्रतिभावंत आणि विद्यार्थ्यांची गतिशीलता वाढवण्याच्या तसेच शैक्षणिक पात्रतेच्या परस्पर मान्यतेचा विस्तार करण्याच्या मार्गांवर नेत्यांनी चर्चा केली. पंतप्रधानांनी नवीन शिक्षण धोरणांतर्गत भारतात कॅम्पस उघडण्यासाठी फ्रेंच विद्यापीठांना आमंत्रित केले. लोथल येथील राष्ट्रीय सागरी वारसा संकुलासह संग्रहालये आणि सांस्कृतिक संस्थांमधील सहकार्य वाढवण्यासही नेत्यांनी सहमती दर्शवली.
पश्चिम आशिया आणि युक्रेनमधील परिस्थितीसह जागतिक महत्त्वाच्या बाबींवर उभय नेत्यांनी आपले विचार मांडले. पंतप्रधानांनी एव्हियान येथे होणाऱ्या आगामी जी-7 शिखर परिषदेत सहभागी होण्याबाबत उत्सुकता व्यक्त केली आणि शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारताला महत्त्वपूर्ण चर्चेत सामील करून घेतल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉं यांचे आभार मानले.
दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांतील लोकांसाठी अधिक संधी निर्माण करण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय शांतता, स्थिरता आणि समृद्धीला चालना देण्यासाठी भारत-फ्रान्स विशेष जागतिक सामरिक भागीदारीच्या महत्त्वाचा पुनरुच्चार केला.
पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉं यांनी भारतातील जयपूर येथे 10 दिवसांच्या कला निवासी कार्यक्रमादरम्यान फ्रेंच कलाकार थिबॉल्ट डी ला लान्स आणि थिओफिल डी बाशे यांनी तयार केलेल्या कलाकृतींचेही अवलोकन केले. या कलाकारांनी भारतीय वारसा आणि सौंदर्यशास्त्रातून प्रेरणा घेऊन भारत आणि फ्रान्सच्या सांस्कृतिक संगमाचे प्रतिबिंब दर्शवणाऱ्या कलाकृती साकारल्या आहेत.
चर्चेनंतर, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉं यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सन्मानार्थ मेजवानीचे आयोजन केले होते.
***
सुषमा काणे/तुषार पवार/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
PM @narendramodi held productive talks with President @EmmanuelMacron in Nice. The leaders discussed cooperation in defence, space, technology, security and innovation. They also explored ways to strengthen economic ties and collaboration in critical minerals, healthcare and… pic.twitter.com/iUd8rb4DFo
— PMO India (@PMOIndia) June 14, 2026
Today’s talks with my friend, President Macron were exceptionally productive. Considering the longstanding friendship between our nations, we have decided to elevate our ties to a Special Global Strategic Partnership.
— Narendra Modi (@narendramodi) June 14, 2026
Our talks covered ways to deepen cooperation in key sectors… pic.twitter.com/u5qHR1f9Cz
India and France will keep working together to boost economic ties. The India-EU FTA provides unparalleled momentum in this regard. We are also launching an Economic Security Dialogue to ensure stronger supply chains in critical minerals and technology. Other areas where we will… pic.twitter.com/8B9FLRO2ep
— Narendra Modi (@narendramodi) June 14, 2026
Les entretiens d’aujourd’hui avec mon ami le Président Macron ont été exceptionnellement productifs. Au regard de l’amitié de longue date entre nos deux nations, nous avons décidé d’élever nos relations au rang de Partenariat stratégique global d’exception.
— Narendra Modi (@narendramodi) June 14, 2026
Nos échanges ont… pic.twitter.com/MtRO1m8q1W
L’Inde et la France continueront de travailler ensemble pour renforcer leurs liens économiques. L’accord de libre-échange Inde-UE offre à cet égard un élan sans précédent. Nous lançons également un Dialogue sur la sécurité économique afin de renforcer les chaînes… pic.twitter.com/Cd4TT7s2xf
— Narendra Modi (@narendramodi) June 14, 2026