Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पेट्रापोल एकात्मिक तपासणी चौकीचे संयुक्त लोकार्पण

पेट्रापोल एकात्मिक तपासणी चौकीचे संयुक्त लोकार्पण


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आज संयुक्तपणे व्हिडिओ कॉन्सफरसिंगच्या माध्यमातून पेट्रापोल एकात्मिक तपासणी चौकीचे उद्‌घाटन केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देखील कोलकाता येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून यात सहभागी झाल्या.

भारत-बांगलादेश व्यापारासाठी पेट्रापोल-बेनापोल ही महत्त्वाची सीमा पार करावी लागते. भारत-बांगलादेश दरम्यान 50 टक्केहून अधिक व्यापार पेट्रापोलमार्गे होतो. पेट्रापोल एकात्मिक तपासणी चौकीमार्गे 15 हजार कोटी रुपयांहून अधिक व्यापार होतो, जो अन्य भारतीय बंदरे आणि जकात नाके एकत्र केले तर त्यापेक्षाही अधिक आहे. दरवर्षी सुमारे 15 लाख लोक आणि दीड लाख ट्रक पेट्रापोल-बेनापोल सीमा पार करतात.
पेट्रापोल एकात्मिक तपासणी चौकीमुळे सुरक्षा, स्थलांतर, सीमाशुल्क आदी कामे प्रभावीपणे करण्यासाठी उत्तम सुविधा उपलबध होतील तसेच व्यक्ती, वस्तू आणि वाहतूक यांची सीमेवरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.

भारत-बांगलादेश सीमेवरील पेट्रापोल एकात्मिक तपासणी चौकी ही आगरतला (भारत) अखाउरा (बांगलादेश) सीमेवरील आगरतला एकात्मिक तपासणी चौकीनंतरची दुसरी तपासणी चौकी आहे. दक्षिण आशियातील हे सर्वात मोठे बंदर असेल.

पेट्रापोल एकात्मिक तपासणी चौकी सुरू झाल्यावर क्षमता दुपटीने वाढेल अशी अपेक्षा आहे आणि स्थानिक व्यापाऱ्यांच्या वेळेची आणि खर्चाची बचत होऊन त्यांना मोठा लाभ होईल. पेट्रापोल एकात्मिक तपासणी चौकीमुळे भारत-बांगलादेश दरम्यान संपर्क आणि आर्थिक एकात्मिकता वृद्धींगत होण्यास मदत होईल.

S.Kane/B.Gokhale