Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘मन की बात’च्या 131 व्या भागातील भाषणाचे ठळक मुद्दे पंतप्रधानांनी समाजमाध्यमावर मांडले


नवी दिल्‍ली, 22 फेब्रुवारी 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या 131व्या भागातील आपल्या संबोधनातील काही प्रमुख ठळक मुद्दे समाज माध्यमावर मांडले आहेत.

‘X’ वरील संदेशांच्या मालिकेत  मोदी म्हणाले:

“एआय इम्पॅक्ट समिट या जागतिक परिषदेने, 140 कोटी भारतीयांच्या सामर्थ्याचे दर्शन घडवले आहे.

येणाऱ्या काळात भारत या क्षेत्रात सातत्याने नवनवीन प्रगती करत राहील.

या परिषदेतील, जागतिक नेत्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या अशा दोन बाबींचाही मी उल्लेख केला.

#MannKiBaat”

 

“आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरू आहे आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेत खेळणाऱ्या भारतीय वंशाच्या खेळाडूंची मोठी संख्या.

#MannKiBaat”

 

“भारत केरळच्या आलिन शेरिन अब्राहमला आदरांजली अर्पण करतो. तिचे वडील अरुण अब्राहम आणि आई  शेरिन अ‍ॅन जॉन यांनी तिचे अवयव दान करण्याचा घेतलेला निर्णय, येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

#MannKiBaat”

 

“उद्यापासून राष्ट्रपती भवनात सुरू होणारा ‘राजाजी उत्सव’ हा एक कौतुकास्पद प्रयत्न आहे. माझ्या खूप खूप शुभेच्छा.

#MannKiBaat”

 

“चला, आपण डिजिटल फ्रॉड आणि डिजिटल अरेस्ट विरुद्ध नेहमी सतर्क राहूया! या दृष्टीने भारतीय रिझर्व्ह बँकेने केलेल्या प्रयत्नांना आपण साथ देऊया.

#MannKiBaat”

 

“ओदिशा, केरळ आणि कर्नाटकातील प्रयत्नांवरून दिसून येते की भारताचे शेतकरी उल्लेखनीय प्रगती करत आहेत.

#MannKiBaat”

 

“‘केरळ कुंभमेळा’ म्हणून लोकप्रिय असलेला हा उत्सव राज्यातील जनतेचा आणि आपल्या गौरवशाली संस्कृतीचा अतूट संबंध अधोरेखित करतो.

#MannKiBaat”

 

“जयललिताजी लोकांच्या हृदयात विराजमान आहेत. तामिळनाडूच्या विकासासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि भारताच्या प्रगतीप्रती असलेली त्यांची बांधिलकी नेहमीच स्मरणात राहील.

#MannKiBaat”

 

“चला, आपण भारतीय वस्तू खरेदी करूया आणि भारतीय उत्पादकांना पाठबळ देऊया!

#MannKiBaat”

 

 

 

 

 

 

* * *

शैलेश पाटील/आशुतोष सावे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai