Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान 25 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशला भेट देणार


नवी दिल्‍ली, 24 डिसेंबर 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 डिसेंबर 2025 रोजी माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त उत्तर प्रदेशातील लखनौला भेट देतील. दुपारी 2.30 वाजता पंतप्रधान राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन करतील आणि यानिमित्त एका सार्वजनिक सभेला ते संबोधित करतील.

स्वतंत्र भारताच्या दिग्गजांच्या वारशाचा सन्मान करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने प्रेरित, राष्ट्र प्रेरणा स्थळ भारतातील सर्वात आदरणीय राजकारण्यांपैकी एक असलेल्या वाजपेयी यांच्या  जीवनाला, आदर्शांना आणि चिरस्थायी वारशाला आदरांजली वाहतील. त्यांच्या नेतृत्वाने देशाच्या लोकशाही, राजकीय आणि विकासात्मक प्रवासावर खोलवर प्रभाव पाडला.

राष्ट्र प्रेरणा स्थळ हे एक ऐतिहासिक राष्ट्रीय स्मारक आणि कायमस्वरूपी राष्ट्रीय महत्त्वाचे प्रेरणादायी संकुल म्हणून विकसित केले गेले आहे. अंदाजे ₹230 कोटी खर्चून बांधलेले आणि 65 एकरच्या विस्तृत क्षेत्रात पसरलेली ही वास्तु नेतृत्व मूल्ये, राष्ट्रीय सेवा, सांस्कृतिक जाणीव आणि सार्वजनिक प्रेरणा यांना प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित कायमस्वरूपी राष्ट्रीय संपत्ती म्हणून कल्पित आहे.

या संकुलात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे ६५ फूट उंच कांस्य पुतळे आहेत, जे भारताच्या राजकीय विचार, राष्ट्र उभारणी आणि सार्वजनिक जीवनात त्यांच्या मौलिक योगदानाचे प्रतीक आहेत. येथे कमळाच्या आकाराच्या संरचनेच्या स्वरूपात निर्मित केलेले एक अत्याधुनिक संग्रहालय देखील आहे, जे सुमारे 98,000चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेले आहे. संग्रहालयात भारताचा राष्ट्रीय प्रवास आणि या दूरदर्शी नेत्यांचे योगदान प्रगत डिजिटल आणि तल्लीन तंत्रज्ञानाद्वारे प्रदर्शित केले जाते. यामुळे   पर्यटकांना एक आकर्षक आणि शैक्षणिक अनुभव मिळणार आहेत. 

राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन हे निःस्वार्थ नेतृत्व आणि सुशासनाच्या आदर्शांचे जतन आणि प्रचार करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि ते वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे.

 

* * *

नेहा कुलकर्णी/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai