Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मोरबीच्या राजमाता विजयकुंवरबा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त


नवी दिल्‍ली, 17 ऑक्‍टोबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरबीच्या राजमाता विजयकुंवरबा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व, सेवाभावी वृत्ती आणि मोरबीच्या जनतेशी असलेले जिव्हाळ्याचे नाते नेहमी स्मरणात राहतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

दिवंगत आत्म्याला शांती लाभावी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली आहे.

एक्स या सामाजिक माध्यमावरील एका संदेशात पंतप्रधान म्हणाले की,

“मोरबीच्या राजमाता आदरणीय विजयकुंवरबा यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. त्यांचे व्यक्तिमत्त्व, सेवाभावी वृत्ती आणि मोरबीच्या जनतेशी असलेले जिव्हाळ्याचे नाते नेहमी स्मरणात राहील.

परमेश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना तसेच चाहत्यांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो.

भावपूर्ण श्रद्धांजली.

ॐ शांती 🙏”

 

* * *

नेहा कुलकर्णी/राज दळेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai